बारामतीत राष्ट्रीय स्तरीय कलर आणि ब्लॅक बेल्ट डिग्री परीक्षा संपन्न

बारामती, 5 सप्टेंबरः बारामती शहरात 4 सप्टेंबर 2022 रोजी राष्ट्रीय स्तरीय कलर आणि ब्लॅक बेल्ट डिग्री परीक्षा संपन्न झाल्या आहेत. सदर परीक्षा युनिक स्पोर्ट्स अँड शोटोकान कराटे डो आसोशिएशन, बारामती शाखेच्या वतीने घेण्यात आल्या. या परीक्षेत ओम अनिल कदम, उत्कर्ष शरद गोलांदे यांना ब्लॅक बेल्ट परीक्षेत 1st दान (डिग्री) तसेच पार्थ संजय पवार याने ब्लॅक बेल्ट 2nd दान मिळवून बारामतीच्या वैभवात एक शिरपेच लावला आहे.

बारामती शहरातील बस स्थानकाचे होणार तात्पुरते स्थलांतर

ओम कदम,उत्कर्ष गोलांडे आणि पार्थ पवार यांनी अनुक्रमे 4-6 वर्ष कराटे या मार्शल आर्ट प्रकारात सातत्य राखून सराव केला. त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर यश संपादन केल्याचे संस्थेचे प्रमुख प्रशिक्षक शिहान गणेश जगताप यांनी सांगितले. उत्तीर्ण झालेल्या मुलांचे आणि प्रशिक्षकांचे माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब जाधव, माजी उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, प्रशांत शिंदे पाटील, अतुल शेठ गोटे, अ‍ॅड.शीतल देशमुख, अ‍ॅड.धिरज पोतेकर, रामचंद्र तांदळे, प्रशांत गाढवे आणि रजनीकांत नकाते यांनी कौतुक केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्या दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *