मुंबई, 12 मे: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र – इ. 10 वी) परीक्षेचा निकाल मंगळवार, 13 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येईल.
ही परीक्षा पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली होती. निकालानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे विषयनिहाय गुण संबंधित संकेतस्थळांवरून पाहता येतील आणि त्याची प्रिंटआउटही घेता येईल. शाळांसाठी एकत्रित निकाल व सांख्यिकीय माहिती https://mahahsscboard.in या संकेतस्थळावर ‘स्कूल लॉगिन’द्वारे उपलब्ध होईल.
निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती व पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा मंडळातर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी https://mahahsscboard.in या संकेतस्थळावरून दि. 14 मे 2025 ते 28 मे 2025 या कालावधीत अर्ज करता येईल. तर शुल्काची भरपाई नेट बँकिंग, डेबिट आणि क्रेडिट कार्ड किंवा यूपीआय द्वारे करता येणार आहे.
दरम्यान, पुरवणी परीक्षा, श्रेणी सुधार व खाजगी परीक्षार्थ्यांसाठी जून-जुलै 2025 मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया गुरुवार, 15 मेपासून सुरु होणार आहे. यासंदर्भात स्वतंत्र परिपत्रक जाहीर करण्यात येणार आहे. याची माहिती शिक्षण मंडळाने दिली आहे.
निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे:
https://results.digilocker.gov.in
https://sscresult.mahahsscboard.in
http://sscresult.mkcl.org
https://results.targetpublications.org
https://results.navneet.com
https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams
https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results
https://www.indiatoday.in/education-today/results
https://www.aajtak.in/education/board-exam-results