बारामतीच्या प्रांताधिकाऱ्यांवर गंभीर आरोप?; चौकशीची मागणी

बारामती, 4 सप्टेंबरः बारामतीमधून जाणाऱ्या पालकी मार्गाच्या पैसे वाटपात मोठा घोळ झाल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे. या घोटाळ्याविरोधात कन्हेरीचे शेतकरी राजेंद्र काटे हे मुंबई येथील आझाद मैदानात गेल्या दोन दिवसांपासून अमरण उपोषणास बसले आहे. पालखी मार्गात बोगस मिळकत उतारा दाखवून पैसे परस्पर लाटण्याचा प्रयत्न प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना हाताशी धरून केल्या जात असल्याचा गंभीर आरोप? कन्हेरीचे शेतकरी सतिश काटे यांनी केला आहे.

आता बारामतीचा कार्यक्रम करायचाय- राम शिंदे

दरम्यान, पुणे सोलापूर हा पालखी मार्गाचे काम जलद गतीने सुरु आहे. या मार्गातील अधिग्रहण केलेल्या जमीनींच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना नियमानुसार पैशांचे वाटपही करण्यात आले आहेत. मात्र काही लबाड बोके पैशांच्या हव्यासापोटी प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने लबाडीने शेतकऱ्यांची फसवणूक करण्याच्या घटना उघकीस येत आहे. असाच प्रकार राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्ष नेता अजित पवार यांच्या गावाशेजारील कन्हेरी गावात घडला आहे.

बारामती तालुक्यात काटेवाडी आणि कन्हेरी हे दोन गाव शेजारी शेजारी आहेत. मात्र कन्हेरी गावातील मिळकत नंबर 276 मध्ये राजेंद्र त्रिंबक काटे यांच्या मालकीची जमिन आहे. या जमिनीवर राजेंद्र काटे यांचे पक्के घरही आहे. मात्र माजी सरपंच सतिश अशोक काटे यांनी बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना हाताशी धरून बोगस मिळकत उतारा 276/1 काढून सदर मिळकतीचे 8 लाख रुपये मला द्या, अशी मागणी केली. तसेच या मिळकतीचे पैसे सतिश काटेंना देण्याचा प्रयत्न प्रातांधिकारी दादासाहेब कांबळे हे करीत असल्याचा आरोप राजेंद्र काटे यांनी केला आहे. सदर प्रकरणाची त्रिसदस्यीय कमिटीकडून चौकशी व्हावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पोपट धवडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *