बारामतीत पुन्हा हिंदू-मुस्लिम ऐक्याचं दर्शन

बारामती, 2 सप्टेंबरः गणेशोत्सव हा सर्व जातीधर्मानं जोडून समाजाला एकसंध करतो, याची प्रचिती बारामती शहरातील सायली हिल येथे आली. सायली हिल गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष रोहीत धोगडे, उपाध्यक्ष राज शिंदे, खजिनदार मिलिंद सावंत, सचिव प्रतीक अक्कर, उपसचिव साहिल माने यांच्या वतीने गणपतीची प्रतिष्ठापना सायली हिल परिसरात करण्यात आली.

पुणे विभागात बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती अव्वल

या गणेश मित्र मंडळाने सायली हिल परिसरातील सोहेल गुलमोहोम्मद शेख आणि त्यांच्या पत्नी शाहीन सोहेल शेख या मुस्लिम कुटुंबाच्या हस्ते 31 ऑगस्ट 2022 रोजी गणपतीची पहिली आरती पार पडली. या घटनेमुळे सायली हिल परिसरासह बारामतीत हिंदू- मुस्लिम समभाव दिसून आला. सदर गणेश मंडळातर्फे परिसरातील लोकांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

इंदापुरात सावकारावर अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *