बारामती, 2 सप्टेंबरः बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत पहिल्या दहामध्ये स्थान पटकावले आहे. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने राज्यात 9 वे तर पुणे विभागात अव्वल स्थान पटकावले आहे. राज्यभरातील बाजार समित्यांची त्यांच्या सन 2021-22 या वर्षाच्या आर्थिक कामगिरीच्या आधारावर वार्षिक क्रमवारी पणन संचालनालयाकडून नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.
इंदापुरात सावकारावर अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल
बाजार समितींना एकूण 200 गुणांपैकी गुण देण्यात आलेले आहेत. या गुणांच्या आधारावर राज्यातील बाजार समित्यांची सन 2021-22 या वर्षीची क्रमवारी निश्चित करण्यात आलेली आहे. यामध्ये लासलगाव (163 गुण), हिंगणघाट (161 गुण), करंजा लाड (161 गुण) तर बारामती 149.50 गुणांसह राज्यात 9 वे तर पुणे विभागामध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. पुणे विभागात बारामती खालोखाल दौंड (143 गुण), अकलूज जि. सोलापूर (137 गुण) अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकावले आहे.
बारामतीत गणपतीचे हर्षोल्हासात आगमन
राज्यातील एकूण 305 बाजार समित्यांपैकी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीने राज्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट बाजार समितीने दुसरा तर वाशिम जिल्ह्यातील कारंजा (लाड) बाजार समितीने तिसरा क्रमांक मिळवला आहे. जागतिक बँकेच्या सहकार्याने राज्यामध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन अर्थात स्मार्ट प्रकल्प राबविला जातो.