जिल्हाधिकारी देशमुख यांचे नागरिकांना आवाहन

पुणे, 31 ऑगस्टः गेल्या दहा वर्षापूर्वी काढलेल्या परंतू माहिती अद्ययावत न झालेल्या आधार अद्ययावती करणाचा प्रायोगिक प्रकल्प भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयाच्या सुचनेनुसार हाती घेण्यात आला आहे. त्या अंतर्गत या प्रकल्पासाठी राज्यातील मुंबई, पुणे आणि ठाणे जिल्ह्याची निवड केली आहे. हा प्रकल्प पुणे जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी आधार पत्रिकेवरील माहिती अद्ययावत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

पोलिसांनी दिले त्या गाईंना जीवनदान

दरम्यान, नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात आधार नोंदणीशी संबंधित यंत्रणांची बैठक पार पडली. बैठकीस उपजिल्हाधिकारी रोहिणी आखाडे, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे राज्य प्रकल्प व्यवस्थापक अभिषेक पांडे, अग्रणी बँक व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर, बीएसएनएलचे विक्री व व्यवस्थापन जिल्हा महाव्यवस्थापक सतिश आळंदकर आदी उपस्थित होते.

अस्तरीकरण विरुद्ध आंदोलनात राजू शेट्टी यांची एन्ट्री

सर्व संबंधितांना हा प्रकल्प यशस्वी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. नागरिकांना आधार अद्ययावत करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही देशमुख यांनी सांगितले. यापूर्वी 27 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील नोंदणीकृत आधार ऑपरेटर्सची बैठक घेऊन त्यांना प्रकल्पाबाबत प्रशिक्षण दिले आहे.

युएआयडीएआयने ‘अपडेट डॉक्युमेंट’ नावाची नवी सुविधा तयार केली आहे. ‘माय आधार’ पोर्टलवर ती उपलब्ध करून दिली आहे. कोणत्याही आधार नोंदणी केंद्रावर देखील माहिती अद्ययावत करता येणार आहे. आधार अद्ययावतीकरण ऐच्छिक स्वरुपाचे आहे. देशातील 40 जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहे. त्यापैकी पुणे जिल्ह्याची निवड केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *