जिल्हाध्यक्षपदी रत्नप्रभा साबळे तर जिल्हा कार्याध्यक्षपदी रविंद्र सोनवणे यांची एकमताने निवड

लोणावळा, 27 ऑगस्टः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या महिला आघाडीच्या ज्येष्ठ नेत्या रत्नप्रभा साबळे यांची पुणे आरपीआय महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी तर रिपब्लिकन पक्षाचे युवा नेते तथा जिल्हा युवा सरचिटणीस रविंद्र सोनवणे यांची आरपीआय युवा आघाडीच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी एक मताने निवड करण्यात आली.

बारामतीमधील 23 गावातील सार्वजनिक गणेश मंडळांची शांतता बैठक संपन्न

लोणावळा येथे नुकतीच रिपब्लिकन पक्षाच्या पुणे जिल्हा कार्यकारिणीची बैठक जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत वरील निवडी एकमताने करण्यात आल्या. आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात क्रियाशील सभासदांची नोंदणी आढावा घेणे, पक्ष बांधणीमध्ये नवीन पदाधिकाऱ्यांचा समावेश करणे, पक्षाच्या ध्येय धोरणाविषयी चर्चा करणे, पदाधिकाऱ्यांचे प्रश्न सोडवणे या संदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली.

या बैठकीला आरपीआय प्रभारी जिल्हा सचिव सुनील शिंदे, विजय (डॅडी) सोनवणे, मधुकर मोरे, संजय वाघमारे, सीमा चोपडे, पुनम घाडगे, सारिका बिराजदार यांच्यासह संपूर्ण जिल्ह्यातून कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्याची नूतन कार्यकारिणी लवकरच जाहीर करणार असल्याचे नूतन जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी जाहीर केले. तर आरपीआयमध्ये युवकांचा सहभाग वाढवणे, युवक आघाडी शाखा स्थापन करण्यास प्राधान्य देणार असल्याचे रविंद्र सोनवणे यांनी निवडीनंतर सांगितले. तर आरपीआयची ध्येय धोरणे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणे व महिलांचा आरपीआयमध्ये सहभाग वाढवण्याचे काम आगामी काळात करू, असे नूतन महिला जिल्हाध्यक्ष रत्नप्रभा साबळे यांनी निवडीनंतर सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *