बारामतीत मारहाण प्रकरणात सावकारसह पंटरांवर गुन्हा

बारामती, 26 ऑगस्टः बारामती शहरातील गणेश मार्केट येथील एका दुकानातील दुकान मालकाला 24 ऑगस्ट 2022 रोजी एका खाजगी सावकार आणि त्याच्या पंटरांकडून बेदम मारहाणीची घटना घडली. सदर मारहाणीचा प्रकारही सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सदर मारहाणीची तक्रार फिर्यादी अभिजीत टाटिया यांनी बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.

निरा नदीतील विसर्ग केला कमी; मात्र….

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरुन, फिर्यादी अभिजीत टाटिया यांचे बारामती शहरातील गणेश मार्केटमध्ये किराणा मालाचे एक दुकान आहे. अभिजीत टाटिया यांनी 2018 साली निरावागस येथील विजय देवकाते यांच्या ओळखीने कुंडलिक काळे यांच्याकडून 5 टक्के व्याजाने 40 हजार रुपये घेतले. तेव्हापासून दर महिन्याला टाटिया हे व्याजाचे पैसे देत असे. तसेच टाटिया यांच्या दुकानातून कुंडलिक काळे हे कधी समक्ष तर कधी व्हाट्सअपवर किराणाची ऑर्डर देत फुकटमध्ये किराणा घेऊन जात होते. आतापर्यंत 40 हजारांच्या बदल्यात अभिजीत टाटिया यांनी कुंडलिक काळे यांना 39 हजार रुपयांचा किराणा माल आणि 1 लाख 27 हजार रुपये रोख दिले आहे. मात्र तरी देखील कुंडलिक काळे हे व्याजाची मागणी करत होते.

कुंडलिक काळे हे 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी अभिजीत टाटिया यांच्या दुकानात आले. दुकानात आल्यानंतर काळे यांनी टाटिया यांना दोन महिन्याचे राहिलेले व्याजाचे 10 हजार रुपयांची मागणी केली. त्यावेळी टाटिया यांनी काळे यांना न्याजाचे पैसे फिटले असल्याचे सांगितले. यावर कुंडलिक काळे यांनी त्यांचा मुलगा अक्षय काळे याला फोन करून टाटिया व्याजाचे पैसे देत नाही म्हणून सांगितले. काही वेळात अक्षय काळे हा त्याच्या तीन पंटरांसोबत टाटिया यांच्या दुकानात आले. दुकानात येताच अभिजीत टाटिया आणि त्यांचे वडिल पुष्कराज टाटिया यांना त्यांच्या कुटुंबियांसमोरच मारहाण करत पैशांची मागणी केली. सदर मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या घटनेनंतर अभिजीत टाटिया यांनी 25 ऑगस्ट 2022 रोजी बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये कुंडलिक काळेसह अक्षय काळे सह तीन जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार भाविद 143, 147, 149, 323 यासह सावकारी अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल केलेला आहे. या प्रकरणात पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या आदेशान्वये कल्याण खांडेकर हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *