बारामती बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

बारामती, 16 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) बारामती बार असोसिएशनच्या 2025-2026 या वर्षासाठीच्या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम बुधवारी (दि.16) जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीसाठी मतदान सोमवार, दिनांक 5 मे 2025 रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत पार पडणार आहे. याची माहिती बारामती बार असोसिएशनच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

निवडणुकीची प्रक्रिया

या निवडणूक प्रक्रियेत उमेदवारी अर्जांची छाननी व आक्षेप मंगळवार, दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी पार पडणार आहेत. त्यानंतर अर्ज माघारी घेण्याची मुदत बुधवार, दिनांक 23 एप्रिल ते शुक्रवार, दिनांक 25 एप्रिल 2025 दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत ठेवण्यात आली आहे. तसेच उमेदवारांची अंतिम यादी शुक्रवार, दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी जाहीर केली जाणार आहे.

मतमोजणी कधी?

या निवडणुकीसाठी मतदानानंतर त्याच दिवशी म्हणजेच सोमवार, दिनांक 5 मे 2025 रोजी संध्याकाळी 5.30 वाजता मतमोजणी होणार आहे. मतदान व मतमोजणीचे ठिकाण बारामती न्यायमंदिरातील पुरुष वकिल कक्ष याठिकाणी निश्चित करण्यात आले आहे.

निवडणूक अधिकाऱ्यांच्या सूचना

तर या निवडणुकीसंदर्भातील सर्व सूचना, अटी व शर्थी दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी पुरुष वकिल कक्षातील नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केल्या जाणार आहेत, याची सर्वांनी नोंद घ्यावी, अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *