बारामतीकरांसाठी महत्त्वाची सूचना – घरबसल्या घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्याची सोय!

बारामती नगरपरिषद ऑनलाईन कर भरणा

बारामती, 18 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) बारामती नगरपरिषदेने शहरातील नागरिकांसाठी कर भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे. त्यानुसार घरपट्टी आणि पाणीपट्टी तसेच मालमत्ता कराची रक्कम थेट QR कोड स्कॅन करून ऑनलाईन भरता येणार आहे. ही सुविधा बारामती नगरपरिषदेने प्रथमच सुरू केली असून, नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरपरिषदेतर्फे करण्यात आले आहे.

कर भरण्याची प्रक्रिया सुलभ झाली

या सुविधेमुळे नागरिकांना घरबसल्या, जलद आणि सहजपणे घरपट्टी आणि पाणीपट्टी यांसारखे कर भरण्याची संधी मिळत आहे. कर भरल्यानंतर त्वरित ऑनलाईन पावती उपलब्ध होणार असल्याने नगरपरिषदेच्या कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. तसेच ही प्रक्रिया आरामदायी बनली आहे. त्यामुळे वेळेत कर भरल्यास दंडात्मक आणि जप्तीची कारवाई टाळता येणार असल्याचे बारामती नगरपरिषदेने म्हटले आहे.

ऑनलाईन कर भरण्याची प्रक्रिया

1. आपल्या बिलावर असलेला QR कोड स्कॅन करा.
2. आवश्यक तपशील भरा आणि ऑनलाइन पेमेंट करा.
3. पेमेंट यशस्वी झाल्यानंतर लगेच पावती मिळेल.

अधिकृत वेबसाईटवर संपर्क साधा

याशिवाय, नगरपरिषदेच्या अधिकृत वेबसाईटवरही ही सुविधा उपलब्ध आहे. बारामतीकरांनी वेळेत कर भरून दंड आणि जप्तीपासून बचाव करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. ऑनलाईन कर भरण्यासाठी https://baramatimc.org नगरपरिषदेच्या या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. तसेच अधिक माहितीसाठी टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन बारामती नगरपरिषदेने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *