बारामती, 1 एप्रिलः छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले या महापुरुषांच्या जयंतीनिमित्त युवा डान्स ग्रुपच्या वतीने युवा सोलो डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बारामतीतील जिजाऊ भवन येथे संपन्न या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या.
या स्पर्धेवेळी सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा देण्यासाठी माजी नगरसेवक किरण गुजर, माजी उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, नवनाथ बल्लाळ, माजी नगरसेवक जयसिंग देशमुख, अभिजित चव्हाण, सोनू काळे, आरती शेंडगे, पिंटूभाऊ गायकवाड, पोपट उघाडे, गौतम शिंदे, सुशील अहिवळे, धीरज भोसले, टिकटॉक स्टार प्राची काशीदकर, काजल पाटील, ऐश्वर्या काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून 60 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. अनेक लाईव्ह शोज गाजविणाऱ्या स्पर्धकांनी ही स्पर्धाही गाजविली. या स्पर्धेचा प्रथम क्रमांक कुंदन आणि सानिका यांनी मिळविला, तर मोनू आणि प्रेम यांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. इशिता आणि आशिष यांनी तिसरा क्रमांक मिळविला. नृत्याची जाण असणाऱ्या बारामतीकरांनी सलग पाच तास सुरू असणाऱ्या या स्पर्धेला अक्षरशः डोक्यावर घेत फार उदंड प्रतिसाद दिला. येणाऱ्या काळात युवा डान्स ग्रुपच्या माध्यमातून अनेक स्टार बारामतीकरांना मिळतील, अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली.
या स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी मुंबईचे प्रसिद्ध डान्स कोरिओग्राफर प्रदीप गुप्ता हे उपस्थित होते. स्पर्धेचे आयोजन रोहन मागाडे, अनिकेत मोहिते, महेश येलूलकर, विकास पवार, रोहित गायकवाड, प्रणव राऊत, निखिल खंडाळे, प्रतीक्षा भोसले, कर्तव्य मेहता, अभि माने, अर्जुन खलसे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केले. तर या स्पर्धेचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर जगताप यांनी केले.