बारामती, 19 ऑगस्टः मागील काही महिन्यांपासून बारामती तालुका पोलीस ठाणे हद्दीतील सुभद्रा मॉल, महिला हॉस्पीटल, व्ही.पी कॉलेज, पेन्सिल चौक परिसरातून मोटारसायकल चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले होते. बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याची जबाबदारी सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार राम कानगुडे, पो. नाईक अमोल नरूटे, पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय मदने, शशिकांत दळवी, दिपक दराडे यांना दिली होती. त्याप्रमाणे सदर पथकाने पोलीस ठाणे अभिलेखावरील मोटारसायकल चोरी करणारे आरोपी तसेच बारामती शहर परिसरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासून तांत्रिक माहिती वरून संशयीत विजय माने (वय 19), प्रदिप साठे (वय 22, सध्या रा. शिरवळ तालुका खंडाळा जिल्हा सातारा) प्रेम इटकर (वय 19, रा. मिलींदनगर, जामखेड, जि. अहमदनगर), संतोष गाडे (वय 42 रा. अंमळनेर, ता.पाटोदा, जि.बीड) यांना ताब्यात घेवून वेगवेगळ्या युक्त्या वापरून त्यांना बोलते केले.
बारामतीतील दहीहंडी आयोजकांना पोलीस प्रशासनाचे आवाहन
सदर आरोपींकडून आतापर्यंत स्कुटी, पल्सर, स्पेलंडर अशा वेगवेगळ्या कंपनीच्या 13 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या 27 दुचाकी मोटार सायकली हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. सदर चोरीस केलेल्या मोटारसायकलींपैकी काही मोटारसायकली आरोपींनी पुरून ठेवल्या होत्या. त्याही हस्तगत करण्यात पोलीस पथकाला यश आले आहे. सदर अटक केलेले आरोपीत हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापुर्वी दरोडयाचा प्रयत्न, चोरी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपींनी
1. बारामती तालुका पोलीस ठाणे 430/18
2. बारामती तालुका पोलीस ठाणे 519/19
3.बारामती तालुका पोलीस ठाणे 117/22
4. बारामती तालुका पोलीस ठाणे 52/22
5. बारामती तालुका पोलीस ठाणे 368/22
6. बारामती तालुका पोलीस ठाणे 376/22
7. वालचंद नगर पोलीस स्टेशन सी.आर.नंबर .88/21
8. जामखेड पोलीस ठाणे सी.आर.. 174 / 22
9. जामखेड पोलीस ठाणे सी.आर.150/22
10. जामखेड पोलीस स्टेशन सी.आर. 264/22
11. जामखेड पोलीस ठाणे सीआर.330/22
12. आष्टी पोलीस ठाणे, सी.आर. 2018 / 22
13 कर्जत पोलीस ठाणे गु.र.क. 459/ 22
14 कर्जत पोलीस ठाणे गु.र.क्र. ४७९ / २२
हे सर्व गुन्हे भादवि कलम 379 मोटरसायकल चोरी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. आणखीन गुन्हे उघडकीस येण्याच्या शक्यता आहे. तसेच या गुन्हेगारांकडे आणखीन मोटरसायकली मिळण्याची शक्यता आहे. त्याबाबत बारामती तालुका पोलीस स्टेशन आणखी तपास करीत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पो.हवा. राम कानगुडे, पो.नाईक अमोल नरूटे, पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय मदने, शशिकांत दळवी, दिपक दराडे यांनी केली आहे.