थकित मालमत्ताधारकांवर बारामती नगरपरिषदेची कारवाई; घरपट्टी व पाणीपट्टी भरण्याचे आवाहन

बारामती नगरपरिषदेची थकबाकीदारांवर कारवाई आणि कर भरण्याचे पर्याय.

बारामती, 25 फेब्रुवारी: बारामती नगरपरिषदेने थकित मालमत्ता धारकांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. बारामती शहरातील नगरपरिषद हद्दीतील थकीत मालमत्ता धारकांना 2024-25 या आर्थिक वर्षात वारंवार नोटीस पाठवून, घरभेटी देऊनही त्यातील काही मालमत्ता धारकांनी नगरपरिषद कार्यालयाकडे अद्याप थकीत कराचा भरणा केलेला नाही. त्यामुळे वसुली पथके आणि जप्ती पथकांमार्फत थकबाकीदारांवर कठोर कारवाई सुरू असून, मालमत्तांवर सील ठोकणे, जप्ती करणे आणि जप्त करण्यात आलेला माल अटकाव करणे यांसारख्या उपाययोजना युद्ध पातळीवर केल्या जात आहेत.

कर भरण्याचे सोपे पर्याय –

या पार्श्वभूमीवर, बारामती नगरपरिषदेकडून बारामतीकरांना वेळेत थकीत कर भरण्याचे आवाहन करण्यात आले असून, 2024-25 या आर्थिक वर्षाचे मिळकत कर आणि पाणीपट्टी भरण्यासाठी सोयीस्कर पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत:
1. ऑनलाईन भरणा – www.baramatimc.org
2. मोबाईल अ‍ॅप – BRM TAX APP.
3. कार्ड पेमेंट – क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे.
4. बँकिंग सुविधा – RTGS, NEFT, IMPS, SI Wallet.
5. QR कोडद्वारे पेमेंट.
6. नागरी सुविधा केंद्रांद्वारे भरणा.

बारामती नगरपरिषदेचे आवाहन

दरम्यान, बारामती नगरपरिषदेने शहरातील वाढीव व मूळ हद्दीतील नागरिकांना वेळेत कर भरून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तसेच कर थकविल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली घरपट्टी व पाणीपट्टी यांचा त्वरित भरणा करून कटुता टाळावी, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *