उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी; दोघांना अटक

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बॉम्ब धमकी

मुंबई, 21 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांना मुंबई गुन्हे शाखा आणि बुलढाणा पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. मंगेश अच्युतराव वायाळ (वय 35) आणि अभय गजानन शिंगणे (वय 22) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ते दोघेही बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव येथील रहिवासी आहेत. याप्रकरणी त्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत कलम 351(3), 351(4) आणि 353(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://x.com/ANI/status/1892794434443760036?t=Z_j178LnGdy3hJwoy3U7Rw&s=19

आरोपींना अटक

पोलिसांच्या माहितीनुसार, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारवर बॉम्ब हल्ला करण्याची धमकी देणारा ईमेल गोरेगाव पोलीस ठाण्याला प्राप्त झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचच्या विशेष पथकाने याप्रकरणाचा तपास सुरू केला. गुन्हा गंभीर असल्याने पोलिसांनी सायबर तंत्रज्ञानाचा वापर करून ईमेल पाठवणाऱ्यांचा शोध घेतला. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यातील दोन संशयितांचे लोकेशन शोधून काढले आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांना ताब्यात घेतले.

पोलीस तपास सुरू

पोलिसांनी या आरोपींना बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव येथून ताब्यात घेतले आहे. त्यांना पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले जात आहे. या आरोपींचा उपमुख्यमंत्र्यांना धमकी देण्यामागील काय होता? आरोपींचे कुणाशी संबंध आहेत? तसेच त्यांच्याकडे आणखी कोणती माहिती आहे? याचा देखील शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्र्यांना धमकी देण्याचे प्रकरण अतिशय गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झाले आहेत. याप्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *