बारामती (रविंद्र सोनवणे) – आधुनिक अस्पृशतेचं जिवंत उदाहरण आज बारामती मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमच्या साक्षीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सहाय्यक अभियंता सुभाष पाटील व धारकरी प्रशांत नाना सातव यांनी कधी नव्हे ते अस्पृश्य वस्तीतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम येथे बेकायदा दौरा करत असताना मोबाईल मध्ये टिपले गेले आहेत. अस्वच्छतेचे साम्राज्य असलेले पाणी व दरवाजे विना संडास पाहण्यापेक्षा पीडब्ल्यूडी चे अधिकारी श्री पाटील हे उच्चशिक्षित धारकरी माननीय नाना सातव यांच्या सूचना व म्हणणे घेण्यात दंग दिसत आहेत.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्टेडियम हे आर्थिक कमाईचं साधन म्हणून उच्चभ्रू पाटील व सातव यांच्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम ची विटंबना करण्याचे काम प्रशासक व काही जातीवादी प्रवृत्ती करत आहेत. स्टेडियमच्या देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली स्वजातीय जातीय द्वेष पसरवणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्टेडियम आर्थिक कमाईचे साधन बनवणे व जातीय द्वेष पसरवणारे कार्यालय बनवणे असे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.