बारामती, 17 ऑगस्टः बारामती शहरात सकाळ आणि दुपार या दोन सत्रात बरेच कॉलेज चालतात. कॉलेज सुटण्याच्या वेळेस अनेक विद्यार्थ हे विना नंबर प्लेट तसेच विनाकारण कॉलेज तसेच शाळा परिसरामध्ये मोटरसायकली घेऊन जोरात आवाज करून फिरत असतात. या मोकाट फिरणाऱ्या मुलांवर निर्भया पथक सुद्धा सतत कारवाई करत असते. परंतु आज, 17 ऑगस्ट 2022 रोजी बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप सकपाळ, पोलीस उपनिरीक्षक घोडके, मोटे, पाटील यांच्या चार टीम तयार करून एकाच वेळी वेगवेगळ्या कॉलेजवर पाठवल्या.
बानपच्या आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं ‘देवमाणूस’चं दर्शन
यात तुळजाराम चतुरचंद कॉलेज, अनेकांत शाळा, टेक्निकल शाळा, रमाकांत शाळा, शाहू हायस्कूल, सातव कॉलेज या ठिकाणी पोलिसांनी सध्या कपड्यात जाऊन दुपारी 3 च्या सुमारास जात कॉलेज सुटण्याच्या वेळेस मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली आहे. तसेच सदर कारवाई बाबत सर्व शिक्षक आणि पालकांना अवगत केले आहे.
अनेक मुलांकडे आई-वडिलांनी घेऊन दिलेल्या स्वयंचलित स्पोर्ट बाईक आहेत. आई-वडिलांनी सुद्धा आपल्या मुलाच्या ताब्यात गाडी देताना त्यांच्या पाल्यांकडे वाहन परवाना (लायसन्स) आहे का? आपल्या पाल्याचं वय वाहन चालविण्याचे आहे का? हे पाहिले पाहिजे. वाहतूक नियमानुसार चालकास विना नंबर गाडी चालवायला देणे, हा गुन्हा असून वाहन मालकास 5 हजार रुपये दंड आकारला जातो. पालकांवर सुद्धा वाहतूक नियमानुसार दंड आकरण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्या पाल्याला वाहन परवाना मिळाल्यानंतरच वाहने चालविण्यास द्यावीत, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी पालकांना केले आहे.