बानपच्या आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं ‘देवमाणूस’चं दर्शन

बारामती, 17 ऑगस्टः बारामती येथील वीर सावरकर जलतरण तलावजवळील चेंबरमध्ये आज, 17 ऑगस्ट 2022 रोजी गाय पडली. जीवाची अकांतिका करत गाय ओरडत होती. मात्र या चेंबरमधून गाय बाहेर काढणार कशी? हा प्रश्न ये जा करणाऱ्या नागरिकांना पडला. मात्र या गायला बाहेर काढण्यासाठी बारामती नगर परिषदेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी ‘देवमाणूस’च्या रुपाने धावून आले.

बारामती नगर परिषदेकडून सामुहिक राष्ट्रगीत गायन

दरम्यान, वीर सावरकर जलतरण तलावजवळील चेंबरचे तोंड हे उघडे होते. पाऊस चांगला झाल्याने चेंबरच्या आसपास मोठ मोठे गवत वाढले आहेत. हे गवत खाण्यासाठी गेल्याने गाय 10 ते 12 फूट खोल चेंबरमध्ये पडली. चेंबरमध्ये गायी पडल्याची माहिती बानपचे आरोग्य निरिक्षक राजेंद्र सोनवणे यांना मिळाली. माहिती मिळताच राजेंद्र सोनवणे यांनी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सोबत घेत घटनास्थळी दाखल झाले. सोनवणे यांनी गाय बाहेर काढण्यासाठी जेसीबीवाल्याला प्रचारण केले. जेसीबी येताच राजेंद्र सोनवणे यांनी कर्मचाऱ्याला चेंबरमध्ये उतरत गायीच्या पाठीला दोन दोर बांधण्यास सांगितले. एक दोर जेसीबीच्या हुकास अडकविला आणि दुसरा दोर कर्मचाऱ्यांसह आरोग्य निरिक्षक सोनवणे यांनी स्वतः धरून गायीला सुखरुप बाहेर काढून जीवनदान दिले. सदर रेस्क्यू ऑपरेशन हे आरोग्य निरिक्षक राजेंद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.

बारामती नगर परिषदेच्या आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी देवमाणूसच्या रुपाने केलेल्या कार्याचे आणि दाखवलेल्या तत्परतेचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *