मुंबई, 04 फेब्रुवारी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि.04) मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच इतर विभागांचे मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते.
https://x.com/AjitPawarSpeaks/status/1886715591895241042?t=q2–Ql120Yc-ImHbJQz4DQ&s=19

मंत्रिमंडळ बैठकीतील प्रमुख निर्णय :
टेमघर धरण दुरुस्तीसाठी निधी मंजूर
टेमघर प्रकल्पाच्या मजबुतीकरणासाठी 315 कोटींना मान्यता
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील टेमघर प्रकल्पाच्या गळती प्रतिबंधक उपाययोजनांची उर्वरित कामे तसेच धरण मजबुतीकरणासाठी 315 कोटी 05 लाख रुपयांच्या खर्चास विशेष बाब म्हणून प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
कोयना जलाशयात बुडीत बंधारे प्रकल्पांना 170 कोटींची तरतूद
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व जावळी तालुक्यात कोयना जलाशयामध्ये 25 बुडीत बंधारे बांधण्याच्या प्रकल्पांसाठी 170 कोटी रुपयांच्या तरतूदीस मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
जमिनींच्या रुपांतरणासाठी अभय योजनेला मुदतवाढ
शेती, अकृषिक, निवासी, वाणिज्यिक अथवा औद्योगिक प्रयोजनासाठी तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थांना भाडेपट्ट्याने किंवा कब्जेहक्काने दिलेल्या शासकीय भोगवटादार वर्ग-2 च्या जमिनी भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतरित करताना कमी अधिमूल्य आकारण्याच्या अभय योजनेस एक वर्षांची मुदत वाढ देण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयांमुळे पाणीपुरवठा, जलसंधारण तसेच भूविकास क्षेत्राला चालना मिळणार आहे.