उन्हाळ्यात कैरीच्या पन्हे पिण्याचे ‘हे’ आहेत फायदे

उन्हाळ्यात कैरीचे पन्हे पिण्याचे अनेक फायदे आहेत. या हंगामी फळाचे अनेक फायदे आहेत. कैरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, फायबर, विटामिन्स आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे आपण कैरीचं लोणचं, मँगो मिल्क शेक, आमरस असे अनेक पदार्थ करतो. मात्र सर्वात जास्त फायदा हा कैरीच्या पन्ह्याचा होतो. कैरीचे पन्ह्याची आंबट गौड चव ही आपल्याला याचे सेवन करण्यास आणि चव घेण्यास भाग पाडते. याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत.

आंब्याला फळांचा राजा समजल्या जाते कारण यामध्ये विटामिन ‘सी’ चे प्रमाण अधिक असते. जे आपल्या रक्तप्रवाहासाठी फारच उत्तम राहते. शरीरातील रक्तसंचार सुधारण्यासाठी याचा उपयोग होतो. कैरीच्या पन्ह्यामुळे ब्लड सर्क्युलेशन नीट वाढवते आणि नव्या प्रवाहासाठीदेखील याचा फायदा होतो.

कैरीच्या पन्ह्यामध्ये नैसर्गिक साखर असते. यामध्ये लॉ ग्लाईसेमिक इंडेक्स असते, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी याचा फायदा होतो. उन्हाळ्याच्या दिवसात याचे सेवन करण्याने इन्शुलिनची पातळी कमी होत नाही. त्यामुळे मधुमेह न वाढता आरोग्याची काळजी घेण्याचं काम कैरीचे पन्हे करते.

कैरीच्या पन्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. याच्या सेवनामुळे पचनस्वास्थ्य चांगले राहून बद्धकोष्ठतेची समस्या होत नाही. उन्हाळ्याच्या दिवसात आंब्याचे पन्हे प्यायल्याने पोट साफ राहते आणि पोटाचा कोटा साफ राहिल्याने पोटाला त्रास होत नाही.

कैरीमध्ये विटामिन ‘सी’ जास्त प्रमाणात असते, ज्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात. यामुळे कॅन्सरच्या विषाणूंना मारण्याचे काम कैरी करत असते. त्यामुळे आतड्याचा कॅन्सर आणि पोटाचा कॅन्सर होण्याचा संभाव्या धोका टळतो.

यातील विटामिन ‘सी’ आणि ‘ए’ ही पोषक तत्वे त्वचेला अधिक चमकदार करण्यासाठी मदत करतात. तसेच चेहऱ्यावर सुरकुत्या नको असतील तर कैरीचे पन्हे पिणे फायदेशीर ठरते. कारण यामुळे त्वचा अधिक सुंदर आणि डागविरहीत करण्यासाठी यातील पोषक तत्वे फायदेशीर ठरतात.

कैरीच्या पन्ह्यामध्ये विटामिन ‘ए’ आढळते. हे डोळयांसाठी लाभदायी राहतात. कैरीचे पन्हे प्यायल्याने डोळे निरोगी राहतात आणि दृष्टीदेखील चांगली राहते. त्यामुळे डोळ्यांची दृष्टी नीट ठेवायची असेल तर कैरीचे पन्हे नक्की प्या.

कैरीच्या पन्ह्यामधील विटामिन ‘सी’ हे पोषण देतेच तसेच यातील पोटॅशियम आणि कॅल्शियम हे दात आणि हिरड्यांच्या निरोगीपणासाठी अधिक फायदेशीर असतात. दात निरोगी ठेवायचे असतील तर कैरीच्या पन्ह्याचा उपयोग करून घेऊ शकता.

उन्हाळ्यात शरीर डिहायड्रेट होण्याची शक्यता जास्त असते. शरीरात योग्य प्रमाणात पाणी पिणे आवश्यक असते. मात्र कैरीच्या पन्ह्यामुळे डिहायड्रेशनपासून वाचता. तसेच हे शरीराला योग्य थंडावा मिळतो.

विटामिन ‘सी’, विटामिन ‘बी’-6, विटामिन ‘ए’ असे सर्व अँटीऑक्सिडंट्स घटक प्रतिकारशक्ती वाढवण्यास मद करतात. हे सर्व घटक कैरीच्या पन्ह्यामध्ये आढळतात. तसेच याचे सेवनाने अनेक आजारांपासून दूर ठेवण्यासही मदत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *