बारामती, 17 जानेवारी: (अभिजित कांबळे) बारामती मधील भिलारवाडी गावात कामगार तलाठी व मंडल अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने गट नंबर 120 मध्ये मुरूम उत्खनन जोरात सुरू असून शेकडो वाहने रोज वाहतूक करीत आहेत. या उत्खननाला जबाबदार असलेले शासकीय कर्मचारी व अधिकारी जाहीर पाठिंबा देत असून गावकऱ्यांना हा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
याबाबत ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला असून गावाची होणारी नैसर्गिक हानी तात्काळ थांबवावी, अन्यथा या वाहनांना व मुरूम उत्खनन करणाऱ्यांच्या विरोधात सामूहिक कायदा तोड आंदोलन करून सदर वाहन व उत्खनन तात्काळ बंद करण्यात येईल, असे प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर ग्रामस्थांचे म्हणणे आहे.72 गट नंबर मौजे भिलारवाडी येथील मुरूम उत्खननाच्या हजारो ब्रासचा बेकायदेशीर मुरूम उत्खननाचे पंचनामे झाले असूनही महसूल प्रशासन कोणाच्या आदेशाची वाट पाहत आहे? असा सवाल येथील ग्रामस्थांनी केला आहे.