राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; पहा कोणाला कोणती खाती?

मुंबई, 22 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप शनिवारी (दि.21) रात्री जाहीर झाले आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थखाते कायम ठेवण्यात आले आहे. नागपूरमध्ये गेल्या आठवड्यात रविवारी (दि.15) मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. यावेळी एकूण 39 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. यात 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्री यांचा समावेश आहे. त्यानंतर काल रात्री राज्याच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले आहे.

https://x.com/ANI/status/1870493946952269931?t=ptcK_dzt73LI7WEV5Y2iqg&s=19



पहा मंत्रिमंडळाचे संपूर्ण खातेवाटप

1) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गृह, ऊर्जा (अपरिपारिक ऊर्जा वगळून), विधी व न्याय, सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क.
2) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम).
3) उपमुख्यमंत्री अजित पवार – अर्थ, राज्य उत्पादन शुल्क.
4) चंद्रशेखर बावनकुळे – महसूल.
5) राधाकृष्ण विखे-पाटील – जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ).
6) हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण.
7) चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री.
8) गिरीश महाजन – जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन.
9) गणेश नाईक – वने.
10) गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा आणि स्वच्छता.



11) दादाजी भुसे – शालेय शिक्षण.
12) संजय राठोड – मृद व जलसंधारण.
13) धनंजय मुंडे – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण.
14) मंगलप्रभात लोढा – कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता.
15) उदय सामंत – उद्योग आणि मराठी भाषा.
16) जयकुमार रावल – पणन, राजशिष्टाचार.
17) पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन.
18) अतुल सावे – इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा.
19) अशोक ऊईके – आदिवासी विकास
20) शंभुराज देसाई – पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण.
21) आशिष शेलार – माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य
22) दत्तात्रय भरणे – क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ.

23) आदिती तटकरे – महिला व बालविकास.
24) शिवेंद्रसिंह भोसले – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून).
25) माणिकराव कोकाटे – कृषी.
26) जयकुमार गोरे – ग्रामविकास व पंचायत राज.
27) नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य.
28) संजय सावकारे – वस्त्रोद्योग.
29) संजय शिरसाट – सामाजिक न्याय.
30) प्रताप सरनाईक – परिवहन.
31) भरत गोगावले – रोजगार हमी योजना, फलोत्पादन, खारभूमी विकास.
32) मकरंद जाधव पाटील – मदत व पुनर्वसन.
33) नितेश राणे – मत्स्यव्यवसाय व बंदरे.
34) आकाश फुंडकर – कामगार.
35) बाबासाहेब पाटील – सहकार.
36) प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण.

राज्यमंत्र्यांची नावे आणि खाती

1) आशिष जयस्वाल – वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय, कामगार.
2) माधुरी मिसाळ – नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ.
3) पंकज भोयर – गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म.
4) मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बाल विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम).
5) इंद्रनील नाईक – उद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण.
6) योगेश कदम – गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *