बारामती तालुक्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

बारामती, 10 ऑगस्टः बारामती शहरात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम आदिवासी एकता बारामती आयोजित आदिवासी विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि बिरसा ब्रिगेड सह्याद्रीच्या वतीने 9 ऑगस्ट 2022 रोजी करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात बारामती तालुक्यासह आसपासच्या परिसरातून यासह पुणे, धुळे, नाशिक, अहमदनगर, नंदुरबार आदी जिल्ह्यांमधून नोकरी, व्यवसाय निमित्त आलेल्या आदिवासी कुटुंबियांनी जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा केला.

निरा नदीकाठच्या गावांना पुन्हा सतर्कतेचा इशारा

‘एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान’ या उक्ती प्रमाणे महादेव कोळी, भिल्ल, पावरा, कोकणी, कोकणा, आंध, कातकरी, पारधी, ठाकर या जमातींचे लोक एकत्र येऊन जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम बारामतीत साजरा केला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी युवक काँग्रेस बारामती शहर कार्याध्यक्ष विशाल जाधव तर उद्घाटक खासदार सुप्रिया सुळेंचे स्वीय सहाय्यक नितीन सातव हे होते. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण शेतकरी योद्धा मासिकाचे संपादक तथा योद्धा प्रोडक्शनचे मालक योगेश नालंदे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विचार मंच महाराष्ट्र राज्याचे कार्यकर्ते शंकर घोडे सर हे होते. यावेळी नितीन सातव आणि योगेश नालंदे यांनी सर्व बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.



कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे विशाल जाधव यांनी सांगितले की, देशाचे मूळ मालक आदिवासी आहेत. त्यांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे. आदिवासी समाजाने जल, जंगल, जमिनीचे खरे जतन करण्याचे काम केले आहे. शासनाने आदिवासी समाजाची योग्य दखल घेऊन त्यांना मान सन्मानाने वागणूक दिली पाहिजे.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व आदिवासी लेखक विश्वनाथ धुमाळे यांनी आदिवासी दिन साजरा का करावा, या विषयी माहिती सांगितली. आदिवासी संस्कृती प्रचारक व प्रसार करण्यासाठी अहोरात्र कष्ट करून ते समाजाचे प्रबोधन करत आहेत. आदिवासी क्रांतिकारक यांचे महत्त्व विश्वनाथ धुमाळे यांनी समाजाला सांगितले. स्वतःचा व समाजाचा विकास साधला पाहिजे, असे विश्वनाथ धुमाळ यांनी सांगितले. तसेच त्यांच्या समवेत मुख्याध्यापक घाडगे सर हे होते.

आदिवासी विचार मंचाचे राज्य सदस्य शंकर घोडे सरांनी शिक्षित व नोकरदार वर्गाला उद्बोधन केले. नोकरी ही आपल्याला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र असल्यामुळे मिळालेले आहे. आपण नोकरीला लागलो आहोत. आपला उदरनिर्वाह उत्तम होत आहे. परंतु, आपल्या गोरगरीब, अशिक्षित, डोंगर दऱ्यात राहणाऱ्या समाजाचे आपण देणे लागतो. समाज सुधारवा, मुख्य प्रवाहात यावा, शिक्षण मिळावे, प्रगती व्हावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपण गावी गेल्यानंतर पेसा (PESA)कायदा तसेच 5 वी अनुसूचीचा वापर करण्यासाठी समाजाचे प्रबोधन करावे. त्यासाठी गावागावात पारंपारिक ग्रामसभा स्थापन करण्यास मदत करावी व प्रबोधन करावे असे नोकरदार वर्गाला शंकर घोडे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष शेळके, परिचय सोमनाथ गावित, स्वागत प्रकाश कोकणी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणपत जाधव यांनी तर आभार मुकुंद वसावे यांनी मानले. कार्यक्रमाला शेकडो आदिवासी समाजाचे कार्यकर्ते व कुटुंबीय उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *