विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर यांची निवड

मुंबई, 06 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांची आज (दि.06) विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यानंतर कालिदास कोळंबकर यांना राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ दिली. हा शपथविधी समारंभ मुंबईतील राजभवनात पार पडला. याप्रसंगी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

https://x.com/ANI/status/1864940087357903355?t=QlTRDRe3gbNKnMyqbImfcA&s=19



पुढील तीन दिवस विधिमंडळाचे विशेष अधिवेशन पार पडणार आहे. हे अधिवेशन 7 डिसेंबर ते 9 डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात नवीन आमदारांना गोपनीयतेची शपथ देण्यात येणार आहे. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष या सर्व नवीन आमदारांना गोपनीयतेची शपथ देत असतात. त्यामुळे राज्य सरकारचा शपथविधी पार पडल्यानंतर विधानसभेच्या हंगामी अध्यक्षांची निवड होणे आवश्यक असते. त्यानुसार, कालिदास कोळंबकर हे आता विधानसभेचे हंगामी अध्यक्ष बनले आहेत.

कालिदास कोळंबकर अध्यक्षपदी कायम?

दरम्यान, उद्यापासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या या विशेष अधिवेशनात कालिदास कोळंबकर यांच्याकडे विधानसभेचे हंगामी अध्यक्षपद देण्यात आले आहे. ते या अधिवेशनातील पहिले दोन दिवस नवीन आमदारांना गोपनीयतेची शपथ देतील. त्यानंतर अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी म्हणजे 9 डिसेंबर रोजी विधानसभेच्या नवीन अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे कालिदास कोळंबकर हे विधानसभेच्या अध्यक्षपदी कायम राहतील की नाही? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, महायुती सरकारच्या मागील काळात भाजप नेते राहुल नार्वेकर यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. त्यामुळे 9 तारखेला विधानसभेच्या नव्या अध्यक्षपदी कोणाची निवड होते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *