दिल्ली, 06 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.06) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असलेल्या एक्सवर ट्विट केले आहे. तसेच त्यांनी या ट्विटमध्ये मुंबईतील चैत्यभूमीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतानाचा फोटो शेअर केला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षाच्या सुरूवातीला मुंबईतील चैत्यभूमीला भेट दिली होती, तेंव्हाचा हा फोटो आहे.
https://x.com/narendramodi/status/1864863582997090421?t=uEdZUJ2oO1oskZLWJRHGiA&s=19
पंतप्रधान मोदी यांचे ट्विट
महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार आणि सामाजिक न्यायाचे दीपस्तंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो, असे पंतप्रधान मोदींनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. समता आणि मानवी प्रतिष्ठेसाठी डॉ. आंबेडकरांनी अथकपणे दिलेला लढा अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. आजच्या दिवशी, ज्याप्रमाणे आपण त्यांच्या योगदानाचे स्मरण करतो, तसेच त्यांचे स्वप्न साकार करण्याच्या आपल्या बांधिलकीचाही पुनरूच्चार करतो, असे ते यामध्ये म्हणाले आहेत.
https://x.com/narendramodi/status/1864920098986954952?t=mirWoOZFQLeYQArMujWFrA&s=19
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज संसद भवनाच्या लॉनमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संसद भवनाच्या लॉनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह, उपराष्ट्रपती जगदीप धनखर, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांसारख्या नेत्यांनी यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.