पुणे, 9 ऑगस्टः पुण्यातील वीर धरणातून निरा नदीत आज, 9 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 9 च्या सुमारास पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. वीर धरणातून निरा नदीत 5737 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे प्रशासनाने निरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
बारामतीत क्रांती दिनी आरपीआयचे भर पावसात आंदोलन
दरम्यान, वीर धरणातील उजवा कालव्याच्या विद्युत गृहातून 800 क्युसेक्स आणि डावा कालव्याच्या विद्युत गृहातून 300 क्युसेक्सने विसर्ग नदीपत्रात सुरू होता. वीर धरणाच्या सांडव्यातून आज सकाळी 9 वाजता 4637 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू करण्यात आला आहे. आताच्या घडीला नीरा नदीपत्रात एकूण 5737 क्युसेक्स विसर्ग सुरु आहे.
बानप उपकर कल्याण निधीचा ठेकेदारांवर उपकार
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गात बदल होऊ शकतो, असे धरण प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी, नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये, असा इशारा धरण प्रशासनाने दिला आहे.