बारामती, 9 ऑगस्टः (प्रतिनिधी- सुशिल कांबळे) बारामती शहरातील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेत, त्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी बारामती नगरपरिषदेसमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने आज, 9 ऑगस्ट 2022 रोजी (क्रांती दिनी) धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
बानप उपकर कल्याण निधीचा ठेकेदारांवर उपकार
या आंदोलनात पुणे जिल्हा युवक सरचिटणीस रविंद्र (पप्पू )सोनवणे, बारामती शहराध्यक्ष अभिजीत कांबळे, जिल्हा सचिव सुनील शिंदे, पुणे जिल्हा महिला कार्याध्यक्षा रत्नप्रभा साबळे, तालुकाध्यक्ष मधुकरराव मोरे, महिला शहराध्यक्षा पुनम घाडगे, प्रसिद्धी प्रमुख मोईन बागवान, नवनाथ भोसले, हर्षद दामोदरे, रोहित भोसले, प्रदीप पाटोळे, ओमकार गायकवाड, सोमनाथ कवडे, शाहरुख तांबोळी, विजय जगताप, सूरज अहिवळे, मयूर मोरे, सचिन दातीर, सुशील कांबळे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते भर पावसात आंदोलन ठिकाणी उपस्थित आहेत.
आरपीआय (आ) च्या प्रमुख मागण्या
- बारामती शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम येथील व्यायाम शाळेत मॅट आणि आरसे बसवावेत. तसेच व्यायाम साहित्यांची फिटिंग करून सदरील व्यायाम शाळा सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात यावी
- याच ठिकाणी ओपन जिम देखील सुरु करण्यात यावी.
- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर टेनिस बॉलवर सराव करण्यास आणि क्रिकेट सामने खेळविण्यास परवानगी द्यावी.
- आरपीआय (आठवले) पक्षाच्या आंदोलनाची दखल घेत आमराई येथील दादासोनगर, वडकेनगर आणि प्रबुद्धनगर आदी भागांतील नागरिकांसाठी जे सार्वजनिक शौचालय बांधले होते, त्या संबंधित शौचालय बांधून 3 ते 4 वर्ष झाले तरी लाईटची जोडणी केली गेली नाही. तरी त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था करावी.
- या भागासह आमराईमधील अंतर्गत रस्त्यांवर देखील लाईटचे पोल बसवावेत.
- सृष्टी कॉम्प्लेक्स पाठीमागील नागरिकांसाठी ड्रेनेज लाईनची व्यवस्था करावी
या प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेसाठी आरपीआय (आ) च्या वतीने धरणे आंदोलन सुरु आहे.