दौंडमध्ये खासगी सावकारांवर कारवाई

दौंड, 8 ऑगस्टः दौंड तालुक्यातील सावकारीवर प्रशासनाकडून कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे दौंडच्या पूर्व भागात खासगी अनेक सावकार धास्तावले आहे. तालुक्यातील खानोटा आणि स्वामी चिंचोली येथील दोन सावकारांच्या दडपशाही विरोधातील कारवाईनंतर बोरीबेल, मळद, रावणगाव, नंदादेवी, लोणारवाडी व खडकी या गावातील अनेक जण अशा खासगी सावकारांकडून त्रस्त असल्याचे चित्र आहे. खासगी सावकारकी करणाऱ्यांचे राजकीय लागेबांधे आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. कारवाई करताना राजकीय हस्तक्षेप होत असल्याने अनेक जण सहसा पुढे येत नाहीत.

बारामतीत क्रांती दिनानिमित्त उपस्थित राहण्याचे आवाहन

व्याजाने दिलेल्या पैशांच्या मोबदल्यात जमीन खरेदीखत करून घेणे, गाडीचे पेपर ताब्यात घेणे, त्या जोरावर गाडी ओढून नेण्याची धमकी देणे, कोरे स्टॅम्प, कोरे चेक घेतल्याने अनेक जण सावकारांकडे गुंतल्याचे वास्तव आहे. पैसे दिले नाही तर जमीन परस्पर दुसर्‍याला विकून टाकू, बँकेत चेक भरून 138 दाखल करेन, अशी भीती सावकार दाखवत असल्याने अनेक जण पुढे येण्यास धजावत नाहीत. चारचाकी गाडीतून सावकारकी करणार्‍या एकाने तर पाच लाख रुपयांचे पंधरा लाख वसूल करूनही 27 लाख रुपयांची खोटी केस एकावर न्यायालयात दाखल केली आहे. दौंड तालुक्यातील लोणारवाडी येथे काही दिवसांपूर्वी खासगी सावकारकीतुन बोगस खरेदीखत तयार करण्याचा प्रकार घडला होता. हे प्रकरण पोलिसात देखील गेले होते, यामुळे हे लोक किती पोचलेले आहेत, हे समजणे गरजेचे आहे.

बारामतीत बेकायदेशीर गौण खनिज वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर

खासगी सावकारकीने त्रस्त असणार्‍यांनी सहकार विभाग तसेच पोलिसांत तक्रार दाखल करावी, सावकारकीच्या जोरावर जमीन लाटण्याचे प्रकार घडल्यास जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार दिल्यास सावकारकीची शहानिशा होऊन कलम 18 नुसार रीतसर कारवाई होऊन खरेदीखत रद्द करून जमीन परत मिळू शकते. – हर्षद तावरे, सहकार सहाय्यक निबंधक, दौंड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *