पुणे, 21 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी काल (दि.20) मतदान पार पडले. यावेळी महाराष्ट्रात सरासरी 65.11 टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली आहे. तर पुणे जिल्ह्यात सरासरी 61.05 टक्के इतके मतदान झाले. यामध्ये इंदापूर मतदारसंघात सर्वाधिक 76.10 टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली आहे. तर पुणे जिल्ह्यात सर्वात कमी मतदान हडपसर मतदारसंघात झाले आहे. यावेळी हडपसरमध्ये 50.11 टक्के इतके मतदान झाले. दुसरीकडे, बारामती विधानसभा मतदारसंघात 71.03 टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली आहे. याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
पुणे जिल्ह्यातील मतदानाची अंतिम टक्केवारी पुढीलप्रमाणे
1) जुन्नर – 68.44 टक्के
2) आंबेगाव – 70.01 टक्के
3) खेड-आळंदी – 67.70 टक्के
4) शिरूर – 68.50 टक्के
5) दौंड – 73.27 टक्के
6) इंदापूर – 76.10 टक्के
7) बारामती – 71.03 टक्के
8) पुरंदर – 60.02 टक्के
9) भोर – 68.01 टक्के
10) मावळ – 72.10 टक्के
11) चिंचवड – 56.73 टक्के
12) पिंपरी – 51.29 टक्के
13) भोसरी – 61.14 टक्के
14) वडगाव शेरी – 55.71 टक्के
15) शिवाजीनगर – 50.90 टक्के
16) कोथरूड – 52.18 टक्के
17) खडकवासला – 56.53 टक्के
18) पर्वती – 55.26 टक्के
19) हडपसर – 50.11 टक्के
20) पुणे कॅन्टोनमेंट – 52.85 टक्के
21) कसबा पेठ – 58.76 टक्के