राज्यात 11 वाजेपर्यंत 18.14 टक्के मतदान! पहा जिल्ह्यांची टक्केवारी

मुंबई, 20 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) विधानसभा निवडणुकीसाठी आज (दि.20) सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू झाले आहे. त्यानुसार मतदारांनी मतदान करण्यासाठी केंद्रांवर रांगा लावल्या आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला राज्यातील नागरिकांचा उत्साह पहायला मिळताना दिसत आहे. दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी 11 वाजेपर्यंत 18.14 टक्के इतके मतदान झाले आहे. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक 30 टक्के मतदान झाले. तर नांदेडमध्ये केवळ 13.67 टक्के इतके सर्वात कमी मतदान झाले आहे. याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. दरम्यान, दिवसभरात ही टक्केवारी वाढणार आहे.

https://x.com/PTI_News/status/1859117683909747119?t=XK0XUChge3psKaOt9uTjyg&s=19

जिल्ह्यातील मतदानाची आकडेवारी पुढीलप्रमाणे (सकाळी 11 वाजेपर्यंत)

विधानसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यात 15.64 टक्के इतके मतदान झाले आहे. तर रायगड 20.40 टक्के, रत्नागिरी 22.93 टक्के, सिंधुदुर्ग 20.91 टक्के, सातारा 18.72 टक्के, सांगली 18.55 टक्के, कोल्हापूर 20.59 टक्के, सोलापूर 15.64 टक्के, अकोला 16.35 टक्के, अमरावती 17.45 टक्के, औरंगाबाद 18.98 टक्के, बीड 17.41 टक्के, भंडारा 19.44 टक्के, बुलढाणा 19.23 टक्के, चंद्रपूर 21.50 टक्के, धुळे 20.11 टक्के, गडचिरोली 30 टक्के, गोंदिया 23.32 टक्के, हिंगोली 19.20 टक्के, जळगाव 15.62 टक्के, जालना 21.29 टक्के, अहमदनगर 18.24 टक्के, लातूर 18.55 टक्के, मुंबई शहर 15.78 टक्के, मुंबई उपनगर 17.99 टक्के, नागपूर 18.90 टक्के, नांदेड 13.67 टक्के, नंदुरबार 21.60 टक्के, नाशिक 18.71 टक्के, उस्मानाबाद 17.07 टक्के, पालघर 19.40 टक्के, परभणी 18.49 टक्के, ठाणे 16.63 टक्के, वर्धा 18.86 टक्के, वाशिम 16.22 टक्के आणि यवतमाळ जिल्ह्यात 16.38 टक्के इतके मतदान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *