डॉमिनिका देश पंतप्रधान मोदींना सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करणार

दिल्ली, 14 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) कॅरिबियन देश असलेल्या डॉमिनिकाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या देशाचा सर्वोच्च सन्मान देण्याची घोषणा केली आहे. डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर असे या पुरस्काराचे नाव आहे. कोरोनाच्या काळात डॉमिनिकाला मदत केल्याबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान करण्यात येणार आहे. येत्या 19 ते 21 नोव्हेंबर रोजी गयाना येथील जॉर्जटाऊन याठिकाणी इंडिया-कैरीकॉम शिखर परिषद होणार आहे. या शिखर परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार आहेत. त्यावेळी डॉमिनिकाच्या अध्यक्षा सिल्व्हानी बर्टन यांच्या हस्ते पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याची माहिती डोमिनिका पंतप्रधान कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

https://x.com/AHindinews/status/1856959178793005319?t=Y0PwGkrCaiXBbTQOLlhUcA&s=19

भारताने डॉमिनिकाला कोविड-19 लसीचे 70 हजार डोस दिले

भारताने फेब्रुवारी 2021 मध्ये डॉमिनिकाला एस्ट्राजेनेका कोविड-19 लसीचे 70 हजार डोस दिले होते. भारताच्या या मदतीचा डॉमिनिकाच नाही तर आसपासच्या कॅरिबियन देशांनाही फायदा झाला. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने डॉमिनिकाला आरोग्यसेवा, शिक्षण आणि माहिती तंत्रज्ञानामध्ये पाठिंबा दिला आहे. तसेच हवामानातील लवचिकता-निर्माण उपक्रमांमध्ये डॉमिनिकाला भारताने दिलेल्या पाठिंब्याचाही या पुरस्काराने गौरव केला आहे, असे या पत्रकात म्हटले आहे.

आरोग्य संकटाच्या वेळी भारताची मदत

यावेळी पंतप्रधान डॉमिनिकाचे पंतप्रधान डॉ. रुझवेल्ट स्केरिट म्हणाले की, “हा पुरस्कार डॉमिनिका आणि विस्तीर्ण प्रदेशाशी पंतप्रधान मोदींच्या एकजुटीबद्दल डॉमिनिकाच्या कृतज्ञतेची अभिव्यक्ती आहे. पंतप्रधान मोदी हे डॉमिनिकाचे खरे भागीदार आहेत, विशेषत: जागतिक आरोग्य संकटाच्या वेळी आमच्या गरजेच्या वेळी. या पाठिंब्याबद्दल आपल्या कृतज्ञतेचे प्रतीक आणि आपल्या देशांमधील मजबूत संबंधांचे प्रतिबिंब म्हणून त्याला डोमिनिकाचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान प्रदान करणे हा आमचा सन्मान आहे. आम्ही ही भागीदारी वाढवण्याची आणि प्रगती आणि लवचिकतेची आमची सामायिक दृष्टी पुढे नेण्यासाठी उत्सुक आहोत.” असे त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *