इंदापूर विधानसभा मतदारसंघात 24 उमेदवार रिंगणात! पहा सर्वांची नावे चिन्ह

इंदापूर, 14 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यातील इंदापूर मतदारसंघ सध्या चर्चेत आहे. इंदापूर मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होणार आहे. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी या मतदारसंघात एकूण 24 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. यामध्ये राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे 4 उमेदवार, नोंदणीकृत राजकीय पक्षांचे 4 उमेदवार आणि 16 अपक्ष उमेदवार यांचा समावेश आहे.

उमेदवारांची नावे, पक्ष आणि चिन्ह

अमोल शिवाजी देवकाते (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) – रेल्वे इंजिन, दत्तात्रय विठोबा भरणे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) – घड्याळ, श्रीपती महादेव चव्हाण (बहुजन समाज पार्टी ) – हत्ती, हर्षवर्धन शहाजीराव पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार) – तुतारी वाजवणारा माणूस, आकाश भाऊ पवार (स्वराज्य निर्माण सेना) – गॅस सिलेंडर, गिरीश मदन पाटील (महाराष्ट्र विकास आघाडी) – ट्रम्पेट, तानाजी उत्तम शिंगाडे (राष्ट्रीय समाज पक्ष) – शिट्टी, हनुमंत कोंडीबा मल्लाव (भारतीय जन सम्राट पार्टी) – डोली, अनिरुध्द राजेंद्र मदन (अपक्ष) – एअर कंडिशनर, अनुप अशोक आटोळे (अपक्ष) – डिझेल पंप, अमोल अनिल रांधवण (अपक्ष) – फलंदाज, अमोल आण्णा आटोळे (अपक्ष) – ग्रामोफोन, किसन नारायण सांगवे (अपक्ष) – पेनाची निब सात किरणांसह, जावेद बशिर शेख (अपक्ष) – सफरचंद, दत्तात्रय सोनबा भरणे (अपक्ष) – अंगठी, पांडुरंग संभाजी रायते (अपक्ष) – ऊस शेतकरी, भगवान बापू खारतोडे (अपक्ष) – विहीर, भिमराव जगन्नाथ शिंदे (अपक्ष) – फुलकोबी, माने प्रविण दशरथ (अपक्ष) – किटली, विकास भिमराव गायकवाड (अपक्ष) – कपाट, सुधीर अर्जुन पोळ (अपक्ष) – फूटबॉल खेळाडू, संजय बापु चंदनशिवे (अपक्ष) – खाट, संभाजी मधुकर चव्हाण (अपक्ष) – ऑटो रिक्शा आणि हर्षवर्धन गोपाळराव पाटील (अपक्ष) – हेल्मेट.

इंदापूरात तिरंगी लढत

राज्यात येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीचा प्रचार सध्या रंगात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या राज्यभरात सभा, रॅली, दौरे पार पडत आहेत. विधानसभा निवडणुकीत यंदा पुणे जिल्ह्यातील इंदापूर मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. देखील चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. इंदापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे हर्षवर्धन पाटील आणि अपक्ष उमेदवार प्रविण माने यांच्यात लढत होणार आहे. या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या आधी हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी हर्षवर्धन पाटलांना शरद पवारांनी इंदापूर मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. अशा परिस्थितीत विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या प्रविण मानेंनी त्यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे या तिरंगी लढतीत इंदापूर तालुक्यातील जनता कोणाच्या बाजूने कौल देणार? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *