बारामती विधानसभा मतदारसंघात 36 उमेदवारांचे अर्ज; पहा सर्व नावे

बारामती, 30 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी बारामती विधानसभा मतदारसंघात 36 उमेदवारांनी एकूण 46 अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 4 नोव्हेंबरपर्यंत आहे. या कालावधीनंतर बारामतीतून किती उमेदवार उभे राहणार? हे निश्चित होईल. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत बारामतीत मतदारसंघ सध्या चांगलाच चर्चेत आहे. बारामती मतदारसंघात यंदा काका विरूद्ध पुतण्या अशी लढत होणार आहे. बारामतीत अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार हे निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बारामतीत कोणत्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले?

1) अभिजीत आवाडे-बिचुकले – अपक्ष
2) चंद्रकांत खरात – बहुजन समाज पार्टी
3) अनुराग खलाटे – अपक्ष
4) सुरेंद्र जेवरे – अपक्ष
5) विनोद चांदगुडे – अपक्ष
6) अजित प्रदिप पवार – सनय छत्रपति शासन
7) दिलीप नाळे – अपक्ष
8) सविता शिंदे – अपक्ष
9) सीमा चोपडे – अपक्ष
10) धनंजय गडतरे – अपक्ष
11) पंढरीनाथ रसाळ – अपक्ष
12) संभाजी होळकर – अपक्ष
13) कौशल्या भंडलकर – अपक्ष
14) गणेश खामगळ – अपक्ष
15) दत्तात्रय जराड – अपक्ष
16) पंकज भिसे – अपक्ष



17) अब्दुलरोफ मुलाणी – अपक्ष
18) मंगलदास निकाळजे – वंचित बहुजन आघाडी
19) बाळासो धापटे – भारतीय नवजवान सेना (पक्ष)
20) अभिजित कांबळे – अपक्ष
21) विनोद जगताप – अपक्ष
22) अजित अनंतराव पवार – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
23) दादा थोरात – अपक्ष
24) सोयल शेख – समता पार्टी
25) युगेंद्र पवार – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार
26) कल्याणी वाघमोडे – अपक्ष
27) मारूती चोपडे – राष्ट्रीय समाज पक्ष
28) अमोल आगवणे – अपक्ष
29) शिवाजी कोकरे – अपक्ष
30) मिथुन आटोळे – अपक्ष
31) राहुल थोरात – अपक्ष
32) सचिन आगवणे – अपक्ष
33) संतोष कांबळे – अपक्ष
34) त्रिशला कांबळे – बहुजन समाज पार्टी (आंबेडकर)
35) विक्रम कोकरे – अपक्ष
36) अमोल चौधर – अपक्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *