बारामती, 4 ऑगस्टः बारामती शहरातील समर्थनगर येथे गेल्या अनेक दिवसापासून पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे समर्थ नगरमध्ये ऐन पावसाळ्यात टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सध्यास्थितीत चालूच आहे.
सध्या समर्थ परिसरात पिण्याच्या पाण्याचे 6 टँकर सुरु आहेत. मात्र सदर टँकर गळके असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे. यामुळे जेथे 6 टँकर लागतात, तेथे 2 टँकर मिळत आहे.
तसेच नासाडी झालेल्या पाण्यात माती मिसळल्याने चिखल तयार होतो. यामुळे या चिखलात परिसरातील डुक्कर, कु्त्र्यांचा वावर वाढत आहे. यामुळे परिसरात आरोग्याचा प्रश्नही उद्भवत आहे.
समर्थ नगरमधील सदर समस्यासंदर्भात मोईन बागवान यांनी आज, 4 ऑगस्ट 2022 रोजी बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांना निवेदन दिले. यावेळी आरपीआय (आ) चे बारामती शहराध्यक्ष अभिजीत कांबळे उपस्थित होते.