रुपाली चाकणकर यांची पुन्हा महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती!

मुंबई, 16 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) रुपाली चाकणकर यांची पुन्हा एकदा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राज्य सरकारने रुपाली चाकणकर यांचा महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. रुपाली चाकणकर यांचा कार्यकाळ येत्या काही दिवसात समाप्त होणार होता. पण त्याआधीच राज्य सरकारने त्यांचा कार्यकाळ पुढील 3 वर्षांसाठी वाढविला आहे. त्यामुळे रुपाली चाकणकर या 2027 पर्यंत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा राहणार आहेत. यासंदर्भातील गॅझेट राज्य सरकारने जारी केले आहे.

https://x.com/mahancpspeaks/status/1846482125291176408?t=SoHsW708K4YToUkdcAWFnA&s=19

अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढविला

तत्पूर्वी, कालच्या दिवशी राज्य सरकारने दिलेल्या 7 राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी पार पडला. यामध्ये रुपाली चाकणकर यांना संधी मिळणार असल्याचे बोलले जात होते. परंतु, त्यांच्या नावाला विरोध झाल्यामुळे त्यांची विधानपरिषदेवर निवड नसल्याची चर्चा आहे. त्यानंतर राज्य सरकारने आता रुपाली चाकणकर यांची पुन्हा एकदा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. त्यामुळे 2024 च्या विधानसभा निवडणुकीत कोणतेही सरकार आले, तरी महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर या पुढील 3 वर्षे कायम राहणार आहेत.

2021 मध्ये अध्यक्षपदी निवड झाली होती

दरम्यान, रुपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी सर्वप्रथम ऑक्टोंबर 2021 मध्ये निवड करण्यात आली होती. तेंव्हापासून त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. तत्पूर्वी, राष्ट्रवादी पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा असलेल्या चित्रा वाघ यांनी 2019 भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर राज्य सरकारने दोन वर्षांनी 2021 मध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *