विक्रीस ठेवलेल्या तिरंगा झेंडाची किंमत एकसारखी ठेवण्याची मागणी

बारामती, 4 ऑगस्टः देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष साजरे होत आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात ‘हर घर तिरंगा अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत देशात प्रत्येक घरावर तिरंगा लावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र तिरंगा झेंडा विक्रीमध्ये वेगवेगळ्या दुकानात वेगवेगळी किंमत आकारण्यात येत आहे. या वेगवेगल्या किंमतींविरोधात ‘वादग्रस्त’चे संपादक संतोष जाधव आणि सामाजिक कार्यकर्ते प्रविण वाघमोडे यांनी आज, 4 ऑगस्ट 2022 रोजी निवेदन दिले आहे. सदर निवेदन हे बारामतीचे तहसिलदार यांना दिले आहे.

बंडखोर आमदारांच्या अपत्रातेसह इतर मुद्द्यांवर पुढील सुनावणी 8 ऑगस्टला

संपूर्ण देशात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार आहे, ही बाब अभिमानास्पद आणि देशाची मान उंचविणारी आहे. त्यास उत्फुर्त प्रतिसाद मिळणार असून यासाठी जे तिरंगा विक्री करणारे नेमले आहेत, त्यांना एकाच रेटने, एकच किंमतीमध्ये तिरंगा झेंडा ठेवावा, त्याची किंमत योग्य व सगळीकडे एकसारखी किंमत असावी. जेणेकरून तिरंग्याच्या नावाखाली जनतेची लुट होवू नये, असे निवेदनात म्हटले आहे. यासाठी आपण बारामती तालुका व बारामती शहर याठिकाणी नेमलेल्या विक्रेत्यास आदेश करावा, अशी विनंती निवेदनात केली आहे. तसेच सदर निवेदन माहितीस्तव बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि माळेगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांना देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *