पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम-किसान व नमो शेतकरी महासन्मान योजनांचे हप्ते देण्यात आले

वाशिम, 05 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि.04) पीएम-किसान सन्मान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला आहे. यासंदर्भात वाशिम येथे कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम-किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 5 वा हप्ता जारी करण्यात आला आहे.

https://x.com/PIBMumbai/status/1842532153453666358?t=jl0fyPkKkP-CbLqxQ47YoQ&s=19

शेतकऱ्यांना 4 हजारांचा लाभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यावेळी पीएम-किसान सन्मान योजनेच्या 18 व्या हप्त्या अंतर्गत एकूण 20 हजार कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले. देशातील सुमारे 9.4 कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. तसेच याप्रसंगी, राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 5 व्या हप्त्या अंतर्गत एकूण सुमारे 2 हजार कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत. याचा लाभ राज्यातील लाखो शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे या योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण 4 हजार रुपये जमा झाले आहेत.

वाशिम येथे विविध उपक्रमांचा शुभारंभ

दरम्यान, पीएम-किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली होती. यापूर्वी या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 2 हजार रुपयांचे 4 हप्ते जारी करण्यात आले होते. त्यानंतर या योजनेचा पाचवा आज देण्यात आला आहे. तत्पूर्वी, वाशिम येथे झालेल्या या कार्यक्रमात 23 हजार 300 कोटी रुपयांच्या कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित विविध उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. तसेच यावेळी कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत 7,500 हून अधिक प्रकल्पांचे लोकार्पण, 9 हजार 200 शेतकरी उत्पादक संस्था, संपूर्ण महाराष्ट्रात 19 मेगावॅट क्षमतेचे पाच सोलर पार्क, आणि पशुधनासाठी युनिफाईड जीनोमिक चिप आणि स्वदेशी बनावटीच्या लिंग-वर्गीकृत वीर्य तंत्रज्ञानाचा शुभारंभ यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *