पंतप्रधान मोदींचा आजचा पुणे दौरा रद्द!

पुणे, 26 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (दि.26) पुणे शहराच्या दौऱ्यावर येणार होते. परंतु, पुणे शहरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा नियोजित पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. दरम्यान, या दौऱ्यात आज पुणे जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशन ते स्वारगेट या भुयारी मेट्रो ट्रेन प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार होते. परंतु, हवामान विभागाने आजही मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्याची नवी तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. तर त्यांच्या पुणे दौऱ्याची नवी तारीख लवकरच कळविण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

https://x.com/ANI/status/1839166715780911547?s=19

पंतप्रधानांचा दौरा रद्द

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या पुणे दौऱ्यात तब्बल 22,600 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात येणार होते. यामध्ये पुणे जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशन ते स्वारगेट या भुयारी मेट्रो ट्रेन प्रकल्पाचे उद्घाटन, पुणे मेट्रो फेज-1 च्या स्वारगेट-कात्रज या मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन, तसेच पुण्यातील भिडे वाडा येथील राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार होते.

https://x.com/DheerajGhate/status/1839198626410619247?s=19

सभेच्या मैदानावर पावसाचे पाणी

तसेच, या कार्यक्रमानंतर पुण्यातील एसपी कॉलेजच्या मैदानावर आज सायंकाळी पंतप्रधान मोदींची सभा पार पडणार होती. परंतु, कालपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सभेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते, तसेच याठिकाणी चिखल झाला होता. तसेच हवामान विभागाने पुणे जिल्ह्याला आजही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदींचा आजचा पुणे दौरा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *