बारामतीत नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई; तिघांना अटक

बारामती, 3 ऑगस्टः बारामती शहरात नागपंचमीनिमित्त अनेकांनी नायलॉन मांजाचा वापर करत सण साजरा केला. याआधीच पोलीस प्रशासनाकडून नायलॉन मांजा वापरू नका, असे आवाहन करण्यात आले होते. मात्र शहरात छुप्या पद्धतीने नायलॉन मांजाची सर्रास विक्री होत आहे.

दरम्यान, शहरातील मुजावर वाडा येथे हजरत पीर चांद शहावली दर्गा नावाची बंद पान टपरीत आरोपी संदीप मनोज पाटील (वय 25, रा. मुजावर वाडा) याने नायलॉन मांजा विक्रीसाठी ठेवलेला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना मिळाली. यानंतर पोलीस निरीक्षक महाडिक यांनी महिला पोलीस उपनिरीक्षक संध्या देशमुख, तुषार चव्हाण, दशरथ कोळेकर, पोलीस हवालदार कल्याण खांडेकर, मनोज कोठे, पोलीस हवालदार शिंदे यांना कारवाईचे आदेश दिले. सदर पथकाने आज, 3 ऑगस्ट रोजी दुपारी 3.30 च्या सुमारास सदर ठिकाणी दोन पंचा समक्ष छापा मारून एकूण नायलॉन मांजाचे 45 बंडल किंमतीचा तब्बल 18 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाईत आरोपी संदीप मनोज पाटील याला अटक केली आहे. संशयित आरोपी संदीप पाटील याच्यावर भादवि कलम 188, 336, 278 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

या ठिकाणी पोलिसांनी 2 ऑगस्ट 2022 रोजी बारामतीत काही मांजाच्या कापण्याच्या घटना घडल्या. यामुळे विविध पथके नेमून काही इसम जर नायलॉन मांजाने जाणीवपूर्वक निष्काळजीपणे पतंग उडवत असतील, तर पतंग उडवणाऱ्यावर सुद्धा 338, 336, 37 प्रमाणे गुन्हा दाखल करणार आहेत. दरम्यान, बारामती शहर पोलिसांनी आमराई आणि कसबा या ठिकाणी छापा मारून आणखी नायलॉन मांजा जप्त केला आहे. बारामती शहर पोलिसांनी आज दिवसभर वेगवेगळे पथके करून तीन ठिकाणी छापे मारण्यात आली. यात आमराई, कसबा आणि मुजावर वाडा या भागांचा समावेश आहे. सदर कारवाईत संदीप मनोज पाटील (रा. मुजावर वाडा बारामती), फिरोज मौला शेख (वय 28, रा. चंद्रमणी नगर आमराई) शकूर दादामिया आत्तार (वय 51, रा. कसबा बारामती) यांच्यावर सुद्धा कारवाई करून दहा बंडल चायना मांजा जप्त केला आहे. संशयित आरोपी फिरोज शेख आणि शकूर आत्तार या दोघांवर निर्भया पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संध्या देशमुख, पोलीस कर्मचारी धागाटे यांनी कारवाई केली आहे.

बारामतीत कापडी पिशवी दुकानाचे उद्घाटन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *