बारामती, 08 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) बारामती शहरातील वसंत नगर येथील श्री अष्टविनायक गणेश उत्सव तरूण मंडळ यांच्यावतीने सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन ढोल ताशाच्या गजरात करण्यात आले. यावेळी लाडक्या बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना बरोबर सायंकाळी पाच वाजता करण्यात आली. बाप्पाची प्रतिष्ठापना करत असताना अनेक विविध क्षेत्रातील कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते तसेच लहान मुले, महिलांची प्रचंड गर्दी होती. आपल्या बाप्पाचा आगमन सोहळा पाहून सर्वांमध्ये उत्साहवर्धक वातावरण होते.
बाप्पा आपल्या स्थानावरती विराजमान झाल्यानंतर बाप्पांच्या आरतीचा मान युवा उद्योजक गणेश भैय्या जाधव तसेच सामाजिक कार्यकर्ते गौरव भंडारे यांना देण्यात आला. श्रींची आरती झाल्यावर त्यांना अष्टविनायक गणेशोत्सव मंडळातर्फे सन्मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी या मंडळाचे अध्यक्ष गौरव जाधव उपाध्यक्ष बबलू दास कार्याध्यक्ष ओंकार जाधव खजिनदार ऋतिक कांबळे व मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच या मंडळाचे आधारस्तंभ ओंकार भैय्या जाधव आणि या मंडळाला मोलाचे मार्गदर्शन करणारे सयाजी राजे गायकवाड उपस्थित होते.