मुंबईत एका उंच इमारतीला भीषण आग

मुंबई, 06 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) मुंबईत पुन्हा एकदा आगीची घटना घडली आहे. मुंबईतील लोअर परळ भागातील टाईम्स टॉवर इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने, या आगीत कोणीही जखमी झाले नाही. सकाळी 6.30 च्या सुमारास या इमारतीला अचानकपणे आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या नऊ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यावेळी त्यांनी अथक परिश्रम करून ही आग आटोक्यात आणली. दरम्यान, या आगीमुळे येथील हवेत प्रचंड प्रमाणात धुराचे लोट पसरले होते.

https://x.com/PTI_News/status/1831917049351684447?s=19

आगीचे कारण अस्पष्ट

मुंबईतील लोअर परळ भागात टाईम्स टॉवर ही 14 मजली इमारत आहे. शुक्रवारी (दि.06) सकाळी 6.30 च्या सुमारास या इमारतीच्या सातव्या ते दहाव्या मजल्यावर अचानकपणे आग लागली. या आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. तोपर्यंत या आगीने रौद्ररूप धारण केले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या पथकाने इमारतीतील लोकांना बाहेर काढले आणि आग विझवण्यास सुरूवात केली. अग्निशमन दलाने दोन तासांहून अधिक काळ अथक परिश्रम करून ही आग आटोक्यात आणली. या आगीत कोणीही जखमी झाल्याचे अद्याप वृत्त नाही. मात्र, या आगीमुळे या इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. सध्या या आगीच्या कारणाचा तपास केला जात आहे.

https://x.com/ANI/status/1831897561390588015?s=19

मनसेचा आरोप

या घटनेवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कमला मिल कंपाऊंडमध्ये आग लागण्याची पाच वर्षांत तिसरी वेळ आहे. इमारतीचे फायर ऑडिट झालेले नाही. कमला मिल कंपाऊंडमध्ये बेकायदा बांधकामे दिवसेंदिवस वाढत आहेत. स्थानिक आमदार बेकायदेशीर बांधकामांना पाठीशी घालत आहेत. जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. लोकप्रतिनिधी बेकायदेशीर बांधकामांना का पाठीशी घालत आहेत? असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *