राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, कोणकोणते निर्णय घेण्यात आले?

मुंबई, 05 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि.05) मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीला विविध विभागांचे मंत्री उपस्थित होते. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. लाडकी बहीण योजनेमुळे अन्य कोणत्याही योजना बंद होणार नाहीत. असे या बैठकीतून सांगण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सुमारे 1 कोटी 60 लाख पात्र महिलांना 4787 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आल्याची देखील माहिती या बैठकीत देण्यात आली आहे.

https://x.com/CMOMaharashtra/status/1831630704133759367?s=19

मंत्रिमंडळाचे निर्णय संक्षिप्त स्वरूपात –

1) पुणे – छत्रपती संभाजीनगर सध्याच्या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करणार.
2) अमरावती जिल्ह्यात नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा देणार.
3) शेवगाव तालुक्यातील सहकारी सूतगिरणीस अर्थसहाय्य देण्यात येणार.



4) अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे 36 हजारांपेक्षा जास्त केंद्रे प्रकाशमान होणार आहेत.
5) बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारले. विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान मिळणार.
6) औद्योगिक कामगार न्यायालयातल्या न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते देणार.
7) थकीत देणी देणाऱ्या कुक्कुटपालन संस्थांना दंडनीय व्याजाची रक्कम माफ.

https://x.com/MahaDGIPR/status/1831645768114966999?s=19

8) धारूर तालुक्यातील सुकळी गावाचे विशेष भाग म्हणून पुनर्वसन करणार.
9) काटोल, आर्वी, येथे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश न्यायालय आणि पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय उभारणार.
10) हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा असणार.
11) लाडकी बहीण योजनेमुळे अन्य कोणत्याही योजना बंद होणार नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *