पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जळगावात लखपती दीदी संमेलनाला हजेरी लावली

जळगाव, 25 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवारी) सकाळी राज्यातील जळगाव येथे लखपती दीदी संमेलनाला हजेरी लावली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान यांसारखे आदी नेते आणि महिला उपस्थित होत्या.

https://x.com/ANI/status/1827595618283311410?s=19

https://x.com/ANI/status/1827609723232764014?s=19 

तीन लाख महिलांना लखपती दीदी बनविण्याचे उद्दिष्ट

जळगाव येथील लखपती दीदी संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 लाख लखपती दीदींना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत. यावेळी पंतप्रधान देशभरातील लखपती दीदी महिलांशी संवाद साधला. केंद्र सरकारने लखपती दीदी योजनेची घोषणा 15 ऑगस्ट 2023 रोजी केली होती. देशात लखपती दीदी योजना सुरू झाल्यापासून एक कोटी महिला लखपती दीदी झाल्या आहेत. केंद्र सरकारने या योजनेच्या माध्यमातून देशातील 3 कोटी महिलांना लखपती दीदी तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

https://x.com/narendramodi/status/1827316083272909311?s=19

नरेंद्र मोदींचे ट्विट

तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ट्विट करून जळगाव दौऱ्याची माहिती दिली होती. “लखपती दीदी संमेलनात सहभागी होण्यासाठी उद्या महाराष्ट्रातील जळगाव येथे जाण्यास मी उत्सुक आहे. या कार्यक्रमात 11 लाख लखपती दीदींना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येतील. ही योजना महिला सक्षमीकरणाला चालना देण्यात ही योजना महत्त्वाची भूमिका बजावत आहे. बचत गटांसोबत काम करणाऱ्या लक्षावधी महिलांना लाभ देण्यासाठी 2500 कोटी रुपयांचा निधी जारी केला जाणार आहे,” असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले होते.

https://x.com/ANI/status/1827597742769570187?s=19

2500 कोटी रुपयांचा निधी वितरीत

पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेसाठी पंतप्रधान मोदी हे 2500 कोटी रुपयांचा निधी जारी करतील. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते 5,000 कोटी रुपयांच्या बँक कर्जाचे वितरणही करण्यात येणार आहे. याचा फायदा देशातील 2.35 लाख बचत गटांच्या 25 लाखांहून अधिक सदस्यांना होणार आहे. दरम्यान, या लखपती दीदी या योजनेअंतर्गत केंद्र सरकार महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 1 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी देत आहे. परंतु, त्यासाठी काही अटी आणि कागदपत्रे पूर्ण करणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *