लाडकी बहीण योजनेचा लाभ 3 हजार रुपयांपर्यंत केला जाईल, मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही

सातारा, 18 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) सातारा येथे रविवारी (दि.18) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री शंभूराज देसाई, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह सातारा जिल्ह्यातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

https://x.com/CMOMaharashtra/status/1825168438798471282?s=19

या योजनेची रक्कम 3 हजारांपर्यंत केली जाईल!

या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना आपल्या भाषणातून संबोधित केले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्वाकांक्षी व क्रांतिकारी योजना आहे. ही योजना लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. राज्याची आर्थिक स्थिती जसजशी मजबूत होत जाईल, तसे सद्यस्थितीत असणारी दरमहा दीड हजार रुपयांची रक्कम वाढवत जाऊन टप्प्याटप्प्याने ही रक्कम 3 हजार रुपयांपर्यंत करण्यात येईल. अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

https://x.com/mieknathshinde/status/1825167337550733584?s=19

35 हजार कोटी रुपयांची तरतूद

या आर्थिक वर्षात योजनेसाठी 35 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महिला जोपर्यंत सशक्त होत नाही, तोपर्यत अर्थव्यवस्था बळकट होत नाही. महिलांना पैसे कुठे कसे खर्च करावे चांगले कळते. या योजनेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. यातून मिळणाऱ्या पैशाचा उपयोग करुन महिला लहान मोठे उद्योग सुरू करतील. राज्याच्या एकूण विकासाच्या दृष्टीने ही योजना महत्त्वपूर्ण ठरेल. त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी सुरु ठेवण्यात येणार असून ती कधीही बंद पडणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, या योजनेबद्दल एका महिलेने प्रतिक्रिया दिली आहे. ज्या महिलांचे कधी खातेसुद्धा उघडले गेले नव्हते, अशा लाखो महिलांची खाती या योजनेमुळे बँकेत उघडली गेली आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्या खात्यावर पैसेही जमा झाले आहेत, याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानते, असे या महिलेने म्हटले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण दिवस साजरा करण्याचे आवाहन

राज्य सरकार बहिणींसाठी हक्काचे माहेर आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून मिळणारी ही ओवाळणी राज्यातील बहिणींना दरमहा मिळत राहणार आहे. त्यामुळे 17 ऑगस्ट हा दिवस ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण दिवस’ म्हणून आपण सर्वांनी साजरा करूया आणि या योजनेचे स्मरण सदैव ठेवूया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये आपल्या खात्यात जमा झाले का? या योजनेसाठी कोणत्याही मध्यस्थाला पैसे द्यायचे नाहीत. हे पैसे तुमच्या हक्काचे आहेत. तुम्हाला आता हक्काचे भाऊ भेटले आहेत आणि आम्हाला हक्काच्या बहिणी भेटल्या आहेत. असे मुख्यमंत्री म्हणाले म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *