इंदापूर/निरगुडे, 09 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निरगुडे येथील शेतकरी भगवानराव खारतोडे आणि त्यांच्या पत्नी यांनी उपोषण सुरू केले आहे. तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुष्काळ निधी देऊन त्याचा अहवाल तात्काळ शासनाला द्यावा, ह्यासाठी भगवानराव खारतोडे मृत्यूची झुंज देत आहेत. 35 दिवस झाले तरीसुद्धा त्यांचे उपोषण स्थगित झाले नाही. इंदापूर तालुक्याचे माजी मंत्री व आमदार दत्तात्रय भरणे आणि जिल्हा परिषदेचे सदस्य प्रवीण भैय्या माने यांनी सुद्धा त्यांच्या उपोषणाला भेट दिली होती. परंतु, अद्याप त्यांना न्याय मिळाला नाही.
संपूर्ण जिल्हा हा दुष्काळग्रस्त घोषित केला आहे. त्यामुळे दुष्काळ निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हावा, या मागणीसाठी निरगुडे गावचे भगवानराव खारतोडे व त्यांच्या पत्नी गेली 35 दिवस उपोषणाला बसले आहेत. त्यावर राज्य शासन व प्रशासन जाणून-बुजून दुर्लक्ष करत असल्याचे समजत आहे. कृषी अधिकारी तलाठी मंडलाधिकारी यांनी पंचनामे केली नाहीत. त्यामुळे शेतकरी हा दुष्काळ निधीपासून वंचित राहिला आहे. यावर तालुक्यातील अनेक गावांमध्ये बाबुराव खारतोडे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन चालू आहे.
जोपर्यंत दुष्काळ निधी हा शेतकऱ्यांना मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार असल्याचे भगवानराव खारतोडे यांनी भारतीय नायकचे संपादक सम्राट गायकवाड यांच्याशी बोलताना सांगितले आहे. तहसीलदारांनी भेट दिली आहे. तरीसुद्धा जोपर्यंत दुष्काळ निधी जमा होत नाही. तोपर्यंत आंदोलन स्थगित करणार नाही, असे उपोषणकर्त्यांनी सांगितले आहे.