हर घर तिरंगा मोहीम: पंतप्रधान मोदींनी डीपी बदलला! देशवासियांना केले आवाहन

दिल्ली, 09 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) स्वातंत्रदिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारपासून ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेला सुरूवात केली आहे. हर घर तिरंगा ही मोहीम देशभरात 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणार आहे. त्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या एक्स (ट्विटर), इंस्टाग्राम, फेसबुक यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा प्रोफाईल पिक्चर बदलून त्याजागी तिरंग्याचा फोटो ठेवला आहे. यासोबतच देशवासीयांनी ही प्रोफाईल पिक्चर म्हणून तिरंग्याचा फोटो ठेवावा आणि त्यांनी हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

https://x.com/narendramodi/status/1821747330158068203?s=19

पहा पंतप्रधान मोदींनी काय म्हटले?

याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. “यंदाचा स्वातंत्र्यदिन जवळ येत आहे, म्हणून आपण पुन्हा एकदा हर घर तिरंगा एक संस्मरणीय जनआंदोलन बनवूया. मी माझे प्रोफाईल पिक्चर बदलत आहे आणि मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, तुम्ही असेच करा आणि आपला तिरंगा उत्सव साजरा करण्यासाठी माझ्यासोबत सहभागी व्हा आणि हो, तुमचा सेल्फी https://harghartiranga.com वर नक्की शेअर करा.” असे नरेंद्र मोदी यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

https://x.com/CMOMaharashtra/status/1821737833226174681?s=19

राज्यात घरोघरी तिरंगा अभियान

तत्पूर्वी, स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने देखील घरोघरी तिरंगा अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानांतर्गत 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत राज्यातील नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकावावा आणि तिरंग्या सोबतचा सेल्फी https://harghartiranga.com वर या वेबसाईटवर अपलोड करून या अभियानात सहभागी व्हा, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. तसेच या अभियानांतर्गत राज्यातील अडीच कोटी घरांवर तिरंगा फडविण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *