लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त शांतता बैठक संपन्न

बारामती, 30 जुलैः तब्बल दोन वर्षांच्या कोरोना कालावधीनंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 1 ऑगस्ट 2022 रोजी जयंती साजरी होणार आहे. यामुळे लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शहरात 1 ऑगस्ट रोजी होणाऱ्या जयंती मिरवणूक आणि प्रतिमा पूजन कार्यक्रमाच्या अनुषंगाने बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांच्या नेतृत्वात 30 जुलै 2022 रोजी शांतता कमिटीची बैठक पार पडली. सदर बैठकीस सामाजिक कार्यकर्ते, राजयकीय मंडळी तसेच तरुणांची उपस्थिती होती.

बारामती शहरात नायलॉन मांजावर कारवाई

बैठकीत पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांनी मिरवणुकीदरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही, अशी काळजी घेण्याचे आवाहन केले. तसेच प्रामुख्याने मिरवणुकीत कोणत्याही ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन होणार नाही, मिरवणुकीत मद्यपान करून सामील होणार नाही, मिरवणुकीत वाहतुकीस अडथळा होणार नाही आदी बाबींची दक्षता घेण्याचे सांगितले. यासह मिरवणूक ही शहराच्या मध्यभागातून जाते, यासाठी पोलीस प्रशासनाने वाहतूक कोंडी होणार नाही, याचे नियोजन करावे, अशी मागणी सामजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. त्याच बरोबर नगर परिषदेने रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, महावितरणने जयंती दिवशी शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणीही शांतता बैठकीत करण्यात आली. तसेच पोलीस ठाण्यातील संबंधित विभागांना या बाबतचा पत्र देण्यात येणार आहे.

सदर शांतता बैठकीत मिरवणूक वेळेत काढून 1 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता संपविण्याचे ठरविण्यात आले. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची साहित्य आणि विचार प्रत्येक घराघरात पोहोचवाव, असा सर्वांनी एकमताने निर्धार केला. सदर बैठकीस उपस्थित कार्यकर्त्यांनी पोलिसांना मिरवणुकीच्या दिवशी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. सदर शांतता बैठकी ही शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *