बीएसएनएल कंपनीचे 5G सिमकार्ड आले समोर, व्हिडिओ व्हायरल

पुणे, 04 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) काही दिवसांपूर्वी खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढविल्या आहेत. त्यानंतर बीएसएनएल कंपनी चर्चेत आली आहे. यादरम्यान, बीएसएनएल 5G सिमकार्ड दाखवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे सिमकार्ड बीएसएनएलचे असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर हा व्हिडिओ बीएसएनएलच्या पुण्यातील अधिकृत कार्यालयामधील असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या व्हिडिओबाबत बीएसएनएल कंपनीकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही.

पहा व्हिडिओ –

https://x.com/ashokdanoda/status/1818681332605526288

व्हिडिओ व्हायरल झाला

तत्पूर्वी, व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत बीएसएनएलच्या पुण्यातील कार्यालयामधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हे बीएसएनएलचे 5G सिमकार्ड दाखवले आहे. तसेच या व्हिडिओत बीएसएनएलच्या सिमकार्ड वर 5G लिहिलेले दिसत आहे. मात्र, कंपनीने 5G सेवेबाबत अधिकृतपणे काहीच सांगितले नाही. तरी या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमुळे बीएसएनएल कंपनी लवकरच 5G सेवा सुरू करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, बीएसएनएल कंपनीकडून 5G सेवेची चाचणी सर्वप्रथम दिल्ली, चेन्नई मुंबई आणि बंगलोर यांसारख्या शहरांमध्ये केली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतरच देशात बीएसएनएलची 5G सेवा सुरू होऊ शकते. त्यामुळे लोकांना वेगवान इंटरनेट मिळेल.

https://x.com/DoT_India/status/1819980720175231089

https://x.com/BSNLCorporate/status/1819419297799913907?s=19

ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडून 5G ची चाचणी

याशिवाय, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिल्लीतील सीडीओटी कॅम्पसमध्ये बीएसएनएल 5G चाचणी दरम्यान पहिला व्हिडिओ कॉल केला. त्यामुळे बीएसएनएल 5G लवकरच ग्राहकांच्या सेवेत दाखल होऊ शकते. खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढविल्यानंतर सरकारी मालकीच्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) च्या ग्राहकांची संख्या वाढत आहे. सध्या बीएसएनएल 4G ची सेवा देत आहे. टाटा, तेजस आणि सी-डॉट सारख्या भारतीय कंपन्या बीएसएनएलचे 4G नेटवर्क उभारण्यात मदत करीत आहेत. ऑक्टोबरअखेर 80 हजार टॉवर्स बसवण्यात येणार असून, मार्च 2025 पर्यंत 1 लाख टॉवर्स बसवण्याचे लक्ष्य आहे, असे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *