बारामती, 28 मार्चः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटामार्फत बारामती शहरातील प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना आज, सोमवार 28 मार्च रोजी स्मरणपत्र देण्यात आले.
या स्मरणपत्रात
- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम मधील व्यायाम शाळेत आलेल्या व्यायाम साहित्यांची फिटिंग करून सदरील व्यायामशाळा सर्व सामान्य नागरिकांसाठी सुरू करण्यात याव,
- यासह संपूर्ण स्टेडियम परिसरात सी.सी.टीव्ही बसवण्यात यावेत.
- प्रबुद्ध नगर, वडके नगर आदी भागातील नागरिकांसाठी बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालय मध्ये लाईट फिटिंग करण्यात यावी. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा (भाऊ) साठे यांचा पूर्णाकृती पुतळा बारामती शहर मध्ये बसवण्यात यावा.
- प्रभाग क्रमांक 19 सृष्टी कॉम्प्लेक्स पाठीमागील नागरिकांसाठी ड्रेनेज लाईनची व्यवस्था करण्यात यावी.
- तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत मधील विस्थापित नागरिकांना लवकरात लवकर पक्की व मजबूत घरे बांधून देण्यात यावेत. आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हा युवक सरचिटणीस रविंद्र (पप्पू) सोनवणे, पुणे जिल्हा सचिव सुनील शिंदे, महिला कार्याध्यक्षा रत्नप्रभा साबळे, शहर अध्यक्ष अभिजित कांबळे, तालुका सरचिटणीस संजय वाघमारे यासह अविनाश कांबळे, शुभम चव्हाण, शाहरुख तांबोळी आदी सामाजिक कार्यकर्ते देखील उपस्थित होते.