पिंपरी चिंचवड परिसरात स्कूल बसचा अपघात; दोन विद्यार्थी किरकोळ जखमी

पिंपरी चिंचवड, 29 जुलैः (विश्वजीत खाटमोडे) पिंपरी चिंचवड परिसरात एका स्कूल बसचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. पिंपरी चिंचवड येथील बीआयटी रोडवर ऑटो क्लस्टरसमोर बीएमडब्लू कार आणि स्कूल बस यांची समोरासमोर धडक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातात 2 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातावेळी बसमध्ये 15 विद्यार्थी उपस्थित होते. आज (दि. 29 जुलै) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

https://x.com/AHindinews/status/1817846197744492981?s=19

सर्व विद्यार्थी सुखरूप

पिंपरी चिंचवड परिसरातील पोतदार इंटरनॅशनल स्कूलची ही बस आहे. ही स्कूल बस आज दुपारी 15 विद्यार्थ्यांना घेऊन जात होती. त्यावेळी बीआयटी रोडवर ऑटो क्लस्टरसमोर या स्कूल बसची आणि बीएमडब्लू कारची समोरासमोर धडक झाली. या अपघात बसमधील 2 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पालकांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. तसेच बाकीचे ही सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत. दरम्यान, या अपघातावेळी बीएमडब्लू कार वेगात असल्याचे म्हटले जात आहे.

कार चालक फरार

या अपघाताचा व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओत बस आणि बीएमडब्लू कारच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसत आहे. या अपघातानंतर बीएमडब्लूचा ड्रायव्हर फरार झाला आहे. त्याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत. यावेळी पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले आहे. सध्या त्याची चौकशी केली जात आहे. तर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर या अपघाताचे खरे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पिंपरी चिंचवडचे सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *