निरा मोरगाव रस्त्यावर भीषण अपघात

बारामती, 29 जुलैः बारामती तालुक्यातील मुर्टी येथील चिरेखानवाडी जवळ निरा मोरगाव रस्त्यावर टँकर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात गुरुवारी, 28 जुलै 2022 रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाला आहे.

पारवडी निंबोडी मार्गावरील पूल गेला पाण्याखाली

दरम्यान, 28 जुलै रोजी सायंकाळी, गुजरात पासिंग असलेला टँकर मोरगावकडून निराकडे जाताना चालकाचा अचानक ताबा सुटला. यामुळे भरधाव टँकर हा निरा मार्गे मोरगावकडे जात असलेल्या दुचाकीस्वाराच्या बाजूने पलटी झाली. या अपघातात दुचाकीस्वाराच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या अपघातातील जखमींवर मोरगाव येथील मयुरेश्वर आयसीयु हॉस्पिलटलमध्ये उपचार सुरु आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *